Saturday, June 15, 2024

सलमानने घातलेल्या घड्याळाने वेधले सर्वांचे लक्ष…नेमकं काय खास आहे या घड्याळात?

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्याची चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतात. पण जास्त चर्चा होते त्यांच्या स्टाईलची. कलाकारांच्या कपड्यांपासून तर त्यांच्या शूज पर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा होते. विशेष म्हणजे त्यांच्या किंमती ऐकून कोणीही चकित होईल. काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खान याने एक निळ्या रंगाचे घड्याळ घातले होते. त्या घड्याळाची प्रचंड चर्चा झाली. पण आता अशाच एका विषयामुळे आणखीन एक अभिनेता चर्चेत आला आहे. तो म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमानचा सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने एक घड्याळ घातलं आहे. त्याची जोरदार चर्चा होत आहे. बघूया नेमकं काय खास आहे या घड्याळात?

सलमानचा (Salman Khan) सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. नुकतेच बिग बॉस १६ (big boss16) वा सिझन समाप्त झाला. या सिझन मधील स्पर्धक सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer) हिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये सलमानने तिच्या खांद्यावर हात ठेवला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि भाईजान आणि छोटा भाईजान.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

 

पण या फोटो मध्ये एक गोष्ट लक्षवेधी ठरली ती म्हणजे सलमानचे अनोखे घड्याळ. हे रोलेक्स कंपनीचं घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत ‘इंडियन वॉच कॉनेसर’ या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच तर हे घड्याळ रोलेक्स कंपनीच्या YACHT मॉडेलचे आहे. या घड्याळमध्ये १८ कॅरेट सोन्याची केस लावली गेली आहे. या घड्याळाची किंमत तब्बल २८ लाख ९० हजार इतकी आहे. या घड्याळाची बाजारातील किंमत ३५ लाख आहे.

 

सलमानच्या घड्याळाची अवाच्या सव्वा किंमतीने सर्वजण चकित झाले आहेत. हा फोटो खूप व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आता सलमान खान त्याच्या चित्रपटा व्यतिरिक्त त्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आला आहे. (bollywood-actor-salman-khan-wear-rolex-expensive-watch-viral-photo)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा
जेव्हा अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला प्रियांका चोप्राने दिला नकार, पाहा काय म्हणाला अभिनेता

हे देखील वाचा