Thursday, July 18, 2024

शितली-आज्या यांच्या ‘लागिरं झालं जी’ मालिकेतील अभिनेत्याचे निधन! कुटुंबावर कोसळलाय दुःखाचा डोंगर

छोट्या पडद्यावरील झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ही मालिका आता बंद झाली असली तरी या मालिकेतील सर्व कलाकार आणि त्यांचे लोकप्रिय ठरलेले डायलॉग आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे. या मालिकेत सर्वात जास्त चर्चा झाली ती आज्या आणि शितलीच्या प्रेमाची. तुम्ही देखील या मालिकेचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या मालिकेतील अभिनेत्याचे एका कार अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे.

‘लागिरं झालं जी’ (Lagira Zala Ji) या मालिकेतील अभिनेते ज्ञानेश माने (Dnyanesh Mane) यांचे अपघातात निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश माने यांचा अपघात रोटी घाटातून प्रवास करताना झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना तात्काळ पुण्यातील ससून या रुग्णालयात दाखल केले होते. परंतू, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (१४ जानेवारी) निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

ज्ञानेश माने हे डॉक्टर होते. मात्र, त्यांना अभिनयाची प्रचंड अवड होती. त्याचमुळे त्यांनी मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश माने हे मुळचे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील रहिवासी होते. ते गेल्यानंतर त्यांच्या मागे कुटुंबात पत्नी, दोन भाऊ, भावजया असा परिवार आहे.

‘लागिरं झालं जी’ या मालिकेत ज्ञानेश यांनी नितीश चव्हाणसोबत आर्मी ऑफिसरची भूमिका साकरली होती. या मालिकेत त्यांच्या या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील आपला हात आजमवला आहे. ज्यात ‘सोलापूर गँगवॉर’, ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’, ‘अंबुज’, ‘हंबरडा’, ‘पळशीची पीटी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा