Saturday, March 2, 2024

मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधानचा ‘लग्नकल्लोळ’, चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीझ

काही दिवसांपूर्वीच ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर आपल्या भेटीला आले होते. पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. आता त्यांच्या लूकवरील पडदा उठला असून त्यांचे चेहरे समोर आले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान दोघेही मुंडावळ्या बांधून वरमाला घेऊन सज्ज आहेत. मात्र दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार, हे अद्याप गुपित आहे. हे गुपित १ मार्चला उलगडणार आहे.

मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, निर्माते डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे म्हणतात, ” चित्रपटात या तिघांच्या भूमिका आहेत, हे यापूर्वीच जाहीर झाले आहे. आता त्यांचे लूक प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. हे कलाकारच इतके कमाल आहेत की, हे कल्लोळ करणार हे नक्की !’’

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आश्विनी महांगडे हिचा मराठी आरक्षणाला पाठिंबा; म्हणाली, ‘आलेल्या हजारो संकटांना या माणसाने…’
एकेकाळी राजामौलींचा तिरस्कार करायचे प्रशांत वर्मा, ‘हनुमान’ दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा