Saturday, December 7, 2024
Home अन्य Review: या आठड्यात काही पाहण्याचा विचार करत असाल तर पाहा ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’, वाचा कसा आहे हा सिनेमा

Review: या आठड्यात काही पाहण्याचा विचार करत असाल तर पाहा ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’, वाचा कसा आहे हा सिनेमा

भारत आणि पाकिस्तान हे दोन असे देश आहे, जेथील सेलिब्रेटींनी फक्त एकमेकांचे नाव जरी उच्चारले तरी बातम्या येणे सुरु होते. भारत, पाकिस्तान या देशांवर आधारित सर्व गोष्टी ह्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांसाठीच चर्चेचा विषय असतो. हा विषय अनेक चित्रपटकरांना देखील खुणावत असतो. आजपर्यंत अनेक निर्मात्या, दिग्दर्शकांनी या विषयांवर बरेच सिनेमे तयार झाले आहे. त्यातील काही चित्रपट हे रॉ आणि आयएसआय विषयावरही आधारित होते. एकमेकांच्या देशात आपले एजेंट्स पाठवून माहिती काढणाऱ्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. नुकताच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ हा सिनेमा सुद्धा अशाच विषयावर आधारित आहे. ‘लंडंन कॉन्फिडेंशियल’ नंतर हा ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ सिनेमा आला आहे.

रिचा चड्ढाचा ‘लाहोर कॉन्फिडेंशियल’ हा सिनेमा ट्रेलर आल्यापासून खूप चर्चेत आला. सिनेमाचा ट्रेलर तर खूपच दमदार होता. नुकताच हा सिनेमा झी 5 वर प्रदर्शित झाला आहे. कुणाल कोहली दिग्दर्शित हा सिनेमा एका स्त्रीच्या नजरेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक साधी डेस्कवर नोकरी करणारी मुलगी अनन्या म्हणजेच रिचा चड्ढा अचानक एका मोठ्या कामासाठी निवडली जाते आणि इथूनच तिच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळते.

अनन्याची (रिचा चड्ढा) एका मिशनसाठी निवड होते आणि तिला पाकिस्तानमध्ये पाठवले जाते. तिथे तिची भेट युक्ती (करिष्मा तन्ना) सोबत होते. ती तिला तिचे पूर्ण काम समजावून सांगते. तिला आयएसआय एजेंट रॉफ जाफरी (अरुणोदय सिंग) याच्याशी मैत्री करून त्याच्याकडून काही माहिती काढायची असते.

तिची आणि रॉफची मैत्री होते. अभ्यासामुळे प्रेमाला कधीच प्राधान्य न दिलेल्या अनन्याला रॉफमध्ये एक प्रियकर दिसायला लागतो, आणि ती त्याच्या प्रेमात पडते. ती रॉफमध्ये इतकी गुंतून जाते की, ती कोणत्या कामासाठी आली आहे हे देखील पूर्णपणे विसरते. अनन्या रॉफला त्याच्या कामात मदत करायला म्हणजे रॉ ची माहिती काढायला मदत करते.

एकदिवस अचानक तिच्यासमोर रॉफची खरी माहिती, त्याचे खरे काम आणि खरा हेतू येतो. अनन्याला या सर्वांचा खूप धक्का बसतो. मात्र ती या गोष्टीतून पटकन बाहेर येते. तिला तिचे खरे काम आणि देशभक्ती याची जाणीव होते, आणि ती तिचे काम करायचे ठरवते.

आता अनन्या तिचे काम करण्यात यशस्वी होते का? रॉफला तिची खरी ओळख समजेल का? अनन्या रॉफचे नक्की काय करेल? आदी अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हा सिनेमा पाहिल्यावर समजतीलच.

हेही वाचा-
द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर  गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात
प्रीती झिंटाच्या  बुमरो बुमरो  गाण्यावर काश्मिरमध्येच थिरकली शहनाज गिल, व्हिडीओने सोशल मीडियावर मिळविल्या लाखो हिट्स

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा