Sunday, December 8, 2024
Home अन्य संगीत क्षेत्रात दबदबा असणार्‍या मंगेशकर कुटुंबीयांच्या आडनावाचा इतिहास आहे खूपच रंजक, वाचा संपूर्ण इतिहास

संगीत क्षेत्रात दबदबा असणार्‍या मंगेशकर कुटुंबीयांच्या आडनावाचा इतिहास आहे खूपच रंजक, वाचा संपूर्ण इतिहास

गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणार्‍या लता दीदींच्या मंगेशकर आडनावाचा एक रंजक इतिहास आहे. काय आहे नेमके कारण चला जाणून घेऊया…

आपल्या जादुई आवाजाने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्‍या लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे कार्य असामान्य आहे. त्यांनी तब्बल 7 दशके संगीत क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्यांना घरातूनच संगीताचे बाळकडू मिळाले होते. संगीत क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मंगेशकर कुटुंबाच्या आडनावाचा एक रंजक इतिहास आहे. ज्याचा संबंध थेट गोव्यापर्यंत जातो.

लता मंगेशकर आणि गोव्यामधील मंगेशी मंदिराचे जुने नाते आहे. त्या नेहमीच या मंदिराला भेट देत असतात. एकदा आजारी पडल्यानंतर त्यांनी या मंदिरात पूजा देशील केली होती. अत्यंत धार्मिक असलेल्या लता मंगेशकर यांनी ट्विटरवरून ही या मंदिराची माहिती दिली होती. या मंदिराचे आणि मंगेशकर कुटुंबाचे संबंध म्हणजे त्यांचे आजोबा गणेश भट्ट नवाथे या मंदिराचे पुजारी होते. हे ऐतिहासिक मंदिर गोव्याची राजधानी पणजीपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर हिंदू धर्माचे प्रसिद्ध ठिकाण मानले जाते.

या मंदिराची कहाणी म्हणजे भगवान शंकरांनी पत्नी पार्वतीला भीती दाखवण्यासाठी एका वाघाचे रूप घेतले होते. त्यावेळी घाबरलेली पार्वती माता भगवान शंकराच्या शोधात निघाली आणि या मंगेशीपर्यंत येऊन पोहोचली त्यांच ठिकाणी हे प्राचीन मंदिर उभारले गेले आहे. 1553 मध्ये या मंगेशी गावावर पोर्तुगीजांनी हल्ला केला होता. त्यावेळी या शिवलिंगाला दुसर्‍या ठिकाणी हलवले होते. मात्र पुन्हा या ठिकाणी मंदिर उभारून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरात लता मंगेशकर यांचे आजोबा पुजारी होते. याच मंगेशी गावाच्या नावावरुन पंडित दीनानाथ यांना मंगेशकर हे आडनाव मिळाले.

दरम्यान, लता मंगेशकर नेहमी या मंदिराला भेट देत असायच्या. मागच्या वर्षी आपल्या जन्मदिनी सुद्धा त्यांनी इथे भेट दिली होती.(lata mangeshkar connection from mangeshi village in goa)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

BIRTHDAY SPECIAL |शाहरुख- काजोललाही आपल्या इशाऱ्यावर नाचवणाऱ्या वरुण धवनचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, एकदा नजर टाका

‘किसी का भाई किसी की जान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून सलमान केले भावुक ट्विट म्हणाला…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा