संगीत क्षेत्रातील सोनेरी पान म्हणून ज्या नावाचा उल्लेख केला जातो, त्या गाण सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात त्यांचे दुःखद निधन झाले. या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. प्रत्येकजण यांच्या आठवणी सांगताना भावूक होत आहे. प्रत्येकाला आपल्या वाटणार्या लता दीदींनी यशाच्या शिखरावर जाऊनही कायम विनम्र राहिल्या त्यांच्या याच महानतेचं आज प्रत्येकजण उदाहरण देऊन भावूक होत आहे. दिग्गज व्यक्तीपासून अगदी प्रत्येकाला लता दीदींनी आपलेसे केले होते. त्यांच्या अत्यंदर्शनासाठी शिवाजी पार्कमध्ये आलेल्या त्यांच्या घरात काम करणार्या सुमन साळवेनेही त्यांच्या आठवणी सांगितल्या.यावेळी सुमनने दीदीच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, “त्यांनी आम्हाला कधीच नोकरा सारखे वागवले नाही की कधी रागाने बोलल्या नाहीत. पाच महिन्यापुर्वी मला ह्रदय विकाराचा झटका आला त्यावेळी दीदींनी स्वतः माझ्या उपचारासाठी डॉक्टरांना कॉल केला.”
नगर जिल्ह्यातील असणारी सुमन साळवे गेली तीन दशके त्यांच्या घरात काम करत आहे. अगदी इंदिरा गांधी असल्यापासून लता दीदींच्या आईंनी तिला आणले होते. आपल्या लाडक्या लता दीदींच्या आठवणी सांगताना भरून आलेल्या सुमनने या जगात दीदींच्या सारखे कोणी नाही आणि यापुढेही कोणी नसेल, असे म्हणत लता मंगेशकर यांच्या मृत्यूचे दुःख व्यक्त केले. लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या घरातील दुसरी नोकर पुष्पा नबार म्हणाली की “दीदी खरच महान होत्या, आम्हाला कधीच त्यांनी नोकर म्हणून वागणूक दिली नाही आमच्याशी नेहमीच त्या प्रेमाने वागत होत्या.”
दरम्यान आपल्या विनम्र आणि प्रेमळ स्वभावाने सर्वांना आपल्या वाटणार्या लाडक्या लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सगळा देश शोक सागरात बुडाला आहे.
हेही वाचा :
‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक
जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम
…म्हणून कॅटरिना कैफने थेट दाबला सलमान खानचा गळा, पाहा संपूर्ण व्हिडिओ