प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. चाहते त्यांच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, लता मंगेशकर यांच्या आरोग्याचे अपडेट समोर आले आहे. भाची रचना शाह हिने लतादीदींची प्रकृती आता कशी आहे हे सांगितले.
भाचीने दिले तब्येतीचे अपडेट
रचना शाहने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सांगितले की, “लता मंगेशकर यांना कोव्हिड- १९ ची सौम्य लक्षणे आहेत. त्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिथे डॉक्टरांची मोठी टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. मित्र आणि चाहत्यांनी त्याच्यासाठी खूप प्रार्थना केल्या आहेत, ज्याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर स्पष्टपणे दिसत आहे. त्या वेगाने बऱ्या होत आहेत.” रचनाने पुढे सांगितले की, लता मंगेशकर सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयातच राहावे लागू शकते. (lata mangeshkar niece rachna shah has spoken about the health of the singer)
कशी झाली कोरोनाची लागण?
लता मंगेशकर ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या डी वॉर्डमध्ये दाखल आहेत. वॉर्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लता मंगेशकर या तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये इतर काही वैद्यकीय स्थितीच्या तपासणीसाठी आल्या होत्या, परंतु येथे उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली.
लतादीदींचे करिअर
लता मंगेशकर यांनी १९४२ मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्या फक्त १३ वर्षांच्या होत्या. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक भाषांमध्ये ३०,००० गाणी गायली आहेत. याशिवाय त्यांना भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांची ‘अजीब दास्तां है ये’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘नीला अस्मान सो गया’ आणि ‘तेरे लिए’ यांसारखी लोकप्रिय गाणी आजही रसिकांना ऐकायला आवडतात.
हेही वाचा-