Monday, July 1, 2024

याहूवर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांच्या यादीत ‘हा’ अभिनेता ‘दबंग’ खानलाही देतोय टक्कर, पाहा यादी

याहूने (yahoo) २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये भारतातील कोणत्या सेलिब्रिटींना इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आले हे सांगितले आहे. याहूच्या या अहवालात भारतातील विविध क्षेत्रांशी संबंधित सर्व टॉप सेलिब्रिटी, टॉप न्यूजमेकर आणि टॉप इव्हेंट्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षात मनोरंजन विश्वातील कोणत्या सेलिब्रिटींना सर्वाधिक सर्च करण्यात आले आणि या यादीत कोण कोण आहेत, हे जाणून घेऊया.

याहू हे सर्च इंजिन असून, इथे लोकं त्यांच्या आवडीनुसार माहिती किंवा मनोरंजन शोधतात. याच आकडेवारीच्या आधारे त्यांनी एक अहवाल तयार केला आहे. याहूने २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेले सेलिब्रिटी कोण आहेत हे सांगितले आहे. या यादीत पहिले स्थान दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे आहे. सिद्धार्थचे याचवर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्याच्या आयुष्याशी संबंधित व्हिडिओ-फोटो पाहण्यासाठी त्याला सर्वात जास्त सर्च करण्यात आले.

सलमान खान दुसऱ्या तर अल्लू अर्जुन आहे तिसऱ्या क्रमांकावर

सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या या यादीत सलमान खान दुसऱ्या क्रमांकावर असून, अल्लू अर्जुन थोड्या फरकाने त्याच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापाठोपाठ दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार चौथ्या स्थानावर आहे. यावर्षी अभिनेता पुनीतचाही मृत्यू झाला. यानंतर असाच आणखी एक दिग्गज अभिनेते जोनिस असून, आता ते देखील या जगात नाही. या यादीत दिग्गज आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार पाचव्या स्थानावर आहे.

Photo Courtesy: Instagram/alluarjunonline and beingsalmankhan

करीना कपूर ही सर्वाधिक सर्च केली जाणारी आहे महिला सेलिब्रिटी

सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या महिला सेलिब्रिटींमध्ये करीना कपूर खान पहिल्या स्थानावर असून, लग्नाबाबत चर्चेत असलेली कॅटरिना कैफ या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या ‘सूर्यवंशी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या यादीत प्रियांका चोप्रा तिसऱ्या क्रमांकावर तर दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

‘तारक मेहता’ हा टीव्ही शो आहे टॉपवर

याहूने आणखी एक यादी जारी केली आहे. ज्यामध्ये २०२१ मधील सर्वाधिक शोधलेले चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटी मालिका आहेत. सब टीव्हीवर प्रसारित होणारा ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा कॉमेडी शो अव्वल स्थानावर असून, ‘राधा कृष्ण’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, वेब शो ‘मनी हाईस्ट – सीझन ५’ आणि ‘शेरशाह’ यांचाही समावेश या यादीत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा