Monday, June 24, 2024

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आईचा व्हिडिओ झाला व्हायरल म्हणाल्या, ‘आजही लोकं माझ्यावर…’

टेलिव्हिजन अभिनेता असणारा सिद्धार्थ शुक्ला प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक होता. आकर्षक व्यक्तिमत्व, जिवंत अभिनय, उत्तम माणूस असणारा सिद्धार्थ शुक्ला आज आपल्यात नसला तरी त्याची आठवण नेहमीच त्याचे फॅन्स काढत असतात. टीव्हीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील झळकलेल्या सिद्धार्थने २ सप्टेंबर २०२१ रोजी अचानक एक्सिट घेतली. त्याचे अचानक या जगातून निघून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. सिद्धार्थ प्रेक्षकांमधेंच इतका लोकप्रिय होता की, त्याच्या जाण्यानंतरही त्याचे फॅन्स त्याच्या परिवाराबद्दल काळजी व्यक्त करत असतात. हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेल्या सिद्धार्थची आई पहिल्यांदाच जगासमोर आली आहे.

सिद्धार्थ आज भलेही आपल्यासोबत नसला तरी त्याच्या आठवणी त्याच्या फॅन्सच्या मनात कायम आहे. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या निधनामुळे फॅन्ससोबतच कलाकारांना देखील मोठा धक्का बसला होता. फॅन्सला त्याच्या जाण्याचे एवढे दुःख आहे तर त्याच्या आईची काय परिस्थिती असेल. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे सर्वात मोठे दुःख त्याच्या आईला रिटा शुक्ला झाले आहे. त्यानंतर अभिनेत्री शहनाज गिलला देखील त्याच्या जाण्याचे सर्वात मोठे दुःख आहे. कारण तो या दोघींच्या सर्वात जवळ होता. त्याच्या जाण्यानंतर आजही त्याचे फॅन्स त्याच्या आईची विचारपूस करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by GillShukla♾ (@vanan_sidnaaz)

सध्या रिटा शुक्ला यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात त्या सर्वांनाच धन्यवाद म्हणताना दिसत आहे. त्यांनी सांगितले की, आजही सिद्धार्थचे फॅन्स त्यांना प्रेम देतात. सिद्धार्थचे फॅन्स त्यांना रिटा माँ म्हणून हाक मारतात. एका लाइव्ह सेशनमध्ये सिद्धार्थच्या आईला विचारले गेले की, तुम्ही सिद्धार्थ शुक्लाच्या बाबतीत काही बोलू इच्छिता का? यावर त्या म्हणाल्या, “मी एवढेच बोलेल की मी मी तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करते. तुमचे सर्व संदेश मला मिळतात. मला खूप आवडते की लोकं माझ्यावर एवढे प्रेम करता याचे एकमेव कारण म्हणजे सिद्धार्थ आहे.”

तत्पूर्वी हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, सिद्धार्थ सर्वात जवळ त्याच्या आईच्या होता. बिग बॉस १३ मध्ये जेव्हा त्याची आई आली तेव्हा तो भाग खूपच गाजला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी : कन्नड चित्रपट दिग्दर्शक एसके भगवान यांना देवाज्ञा
जेव्हा अन्नू कपूर यांच्यासोबत इंटिमेट सीन द्यायला प्रियांका चोप्राने दिला नकार, पाहा काय म्हणाला अभिनेता

हे देखील वाचा