Saturday, July 6, 2024

‘मी काहीच विसरले नाही, मी अखेरची मुघल आहे…’, आशा भोसलेंच्या विधानाने वेधले सर्वांचे लक्ष

संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले या आज ८ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. आशा भोसले (Asha Bhosle) यांनी त्यांच्या 80 वर्षांच्या कारकीर्दीत आतापर्यंत जवळपास सर्व भाषेत 12 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. कदाचित आज असा एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्याला आशा भोसले माहिती नसतील.

त्यांच्या आवाजाची मोहिनी सर्वांवर पसरली आहे. त्यांच्या बहीण लता मंगेशकर यादेखील दिग्गज गायिका होत्या. या मंगेशकर बहिणींनी संगीत विश्वाला गाण्यांचा खजिना दिला आहे. आता त्या दुबईत आपला 90वा लाईव्ह कॉन्सर्ट करणार आहेत, याच संदर्भात त्यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यादरम्यान त्यांनी मोठे भाष्य केले.

काय म्हणाल्या आशा भोसले?
आशा भोसले म्हणाल्या की, “इंडस्ट्रीचा जो इतिहास आहे, तो फक्त मला माहिती आहे. प्रत्येकाच्या आयुष्याविषयी माहिती आहे. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, गायक, सर्वांना मी ओळखते. जर मी यांच्याविषयी बोलायला बसले, तर मला 3-4 दिवस लागतील. इतक्या कहाण्या आहेत. त्या सर्व माझ्या मनात येतात. मी काहीच विसरले नाहीये. मी शेवटची मुघल आहे, मी सिनेसृष्टीतील अखेरची मुघल आहे.”

आशा भोसले 80 वर्षांपासून सक्रिय
आशा भोसले या तब्बल 80 वर्षांपासून सक्रिय आहेत. त्या त्यांचा 90वा वाढदिवस साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी वयाच्या 10व्या वर्षीपासून गायनाला सुरुवात केली होती. त्यांच्या सुपरहिट हिंदी गाण्यांमध्ये ‘परदे में रेहने दो’, ‘झुमका गिरा रे’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘छोड दो आंचल जमाना क्या कहेगा’, ‘रंगीला रे’, ‘आईये मेहरबान’, ‘दिल चीज क्या है’ यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त मराठीत त्यांनी ‘नभ उतरू आलं’, ‘असता समीप दोघे’, ‘झुंजुर मुंजुर’, ‘सांज ये गोकुळी’, ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला’ यांसारखी सुपरहिट गाणी गायली आहेत. (legendary singer asha bhosle on bollywood says she knows many thing about bollywood people)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
कंगना रणौतने केले शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे कौतुक; म्हणाली, ‘गॉड ऑफ सिनेमा’
…म्हणून विद्याधर जोशी यांच्यासाठी रितेश देशमुखने हॉस्पिटलमध्येच दाखवला ‘वेड’ सिनेमा

 

हे देखील वाचा