Friday, December 8, 2023

…म्हणून विद्याधर जोशी यांच्यासाठी रितेश देशमुखने हॉस्पिटलमध्येच दाखवला ‘वेड’ सिनेमा

अभिनेता रितेश देशमुखने यावर्षी दिग्दर्शनात प्रवेश केला. त्याने मराठीतील वेड या सिनेमाचे दिग्दर्शन केले. तसेच मुख्य अभिनेता म्हणून देखील त्यांनी भूमिका साकारली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जिया शंकर आणि जेनेलिया देशमुख अभिनेत्री होत्या. यासोबतच चित्रपटात अशोक सराफ, विद्याधर जोशी या कलाकारांनी देखील खूप चांगले काम केले. त्यांच्या भूमिका देखील सगळ्यांना खूप आवडल्या.

‘वेड’ या चित्रपटाने महाराष्ट्रात नव्हतं संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळवली आहे. सगळ्यांना त्यांचा हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट जवळपास 45 दिवस सिनेमागृहामध्ये होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. तसेच या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर देखील नुकताच पार पडला. त्याला देखील प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.

या चित्रपटात विद्यार्थी जोशी यांनी जेनेलिया देशमुख हिच्या वडिलांचे पात्र साकारले. त्यांचे पात्र देखील सगळ्यांना खूप आवडले. हा सिनेमा प्रदर्शित झाला त्यावेळी विद्याधर जोशी हे हॉस्पिटलमध्ये होते त्यांना फुफुसांचा आजार झाला होता. त्यावेळी रितेश देशमुख त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेला तेव्हा ते म्हणाले की हा चित्रपट मला थेटरला येऊन बघता येणार नाही.

त्यावेळी विद्याधर जोशी यांचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे त्यांना कुठे जाता येत नव्हते. त्यामुळे रितेश देशमुखने त्यांना हॉस्पिटलमध्येच चित्रपट दाखवण्याची संपूर्ण व्यवस्था केली होती आणि विद्याधर जोशी यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांचा वेड हा चित्रपट पाहिला होता.

काही दिवसांपूर्वी विद्याधर जोशी यांच्यावर फुफुसांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. गेल्या तीन वर्षापासून त्यांना फुफुसाचा हा त्रास जाणवत होता. त्यामुळे यावर्षी त्यांचे शस्त्रक्रिया पार पडली परंतु हाती आलेल्या माहितीनुसार आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
आशा भोसलेंना ‘दम मारो दम’ गाण्याची रॉयल्टी देण्याची मागणी; ऍपल इव्हेंटमध्ये फेमस झाले होते गाणे
सोनालीच्या सौंदर्याची जादू आजही तशीच! नवे फोटो पाहून चाहते बेभान

हे देखील वाचा