Thursday, April 10, 2025
Home कॅलेंडर बिग ब्रेकिंग! गाणकोकिळा लता मंगेशकर कोरोनाच्या विळख्यात, आयसीयूत दाखल; पाहा प्रकृतीचे अपडेट्स

बिग ब्रेकिंग! गाणकोकिळा लता मंगेशकर कोरोनाच्या विळख्यात, आयसीयूत दाखल; पाहा प्रकृतीचे अपडेट्स

गाणकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्या आयसीयूमध्ये आहेत. (Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19)

ANI Tweet Lata Mangeshkar Corona Positive
ANI Tweet Lata Mangeshkar Corona Positive

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या जवळचे नातेवाईक रचना यांनी ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिल्यानंतर ही बातमी समोर आली आहे.

हेही पाहा: कुणाचा व्हिडिओ गाजला, तर कुणाचा नवा चित्रपट येतोय; पाहा काय काय घडलंय

नोव्हेंबर २०१९ च्या सुरुवातीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी लता मंगेशकर यांची धाकटी बहीण उषा यांने लता दीदींना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे सांगितले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लता मंगेशकर यांनी त्यांचा ९२ वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा केला. सोशल मीडियावर सर्वत्र गाणसम्राज्ञी लता दीदींवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत होता.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर
सात दशकांच्या कारकिर्दीत, इंदोरमध्ये जन्मलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी १००० हून अधिक हिंदी चित्रपटांना तसेच विविध प्रादेशिक आणि परदेशी भाषांमधील हजारो गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांचा शेवटचा पूर्ण अल्बम २००४ मध्ये दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा दिग्दर्शित ‘वीर झारा’ या चित्रपटासाठी होता. त्यांचे शेवटचे गाणे ‘सौगंध मुझे इस मिट्टी की…’ हे होते, जे ३० मार्च, २०२१ रोजी भारतीय सैन्याला श्रद्धांजली म्हणून प्रदर्शित करण्यात आले होते.

सन २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांची अजरामर गाणी
लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यामध्ये ‘लग जा गले फिर से’, ‘भीगी भीगी रातों में’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘आप की आँखो में कुछ’, ‘कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा