दु:खद! अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनामुळे निधन, धर्मेंद्र अन् विनोद खन्ना यांच्यासोबत केले होते काम

Legendery Actress Sripada Passes Away Due To Covid- 19 Complications


कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत अनेक कलाकारांनी आपला जीव गमावला आहे. अशातच आता आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. आपल्या अभिनयाने हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टी गाजवलेली अभिनेत्री श्रीप्रदा यांचे बुधवारी (५ मे) निधन झाले आहे. त्या कोरोना व्हायरसने ग्रस्त होत्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सिने एँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) याचे जनरल सेक्रेटरी अमित बहल यांनी श्रीपदी यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी केली. त्यांनी म्हटले की, “कोव्हिडची दुसरी लहर अनेक मौल्यवान जीव घेतले आहेत. माध्यमांमध्ये ज्या लोकांच्या निधनाबद्दल लिहिले आहे, त्याबद्दल सतत बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु हो श्रीप्रदा ज्येष्ठ सदस्या होत्या.”

दाक्षिणात्यसोबतच हिंदी चित्रपटातही केले काम
श्रीप्रदा यांनी अनेक वर्षे चित्रपटसृष्टीची सेवा केली. त्यांच्या कामाची चांगली प्रशंसा करण्यात आली. जवळपास ६८ चित्रपट करणाऱ्या श्रीप्रदा यांच्याबद्दल बोलताना बहल पुढे म्हणतात, “त्यांनी साऊथसोबतच हिंदी चित्रपटातही सर्वोत्तम कामगिरी केली. हे दुर्दैव आहे की, आम्ही एक ज्येष्ठ अभिनेत्री गमावली आहे. आम्ही प्रार्थना करतो की, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. आम्ही सर्वजण अशीही प्रार्थना करतो की, महामारीच्या दुसऱ्या लाटेने इतरांचा जीव घेऊ नये. विशेषत: आमच्या इंडस्ट्रीशी निगडीत व्यक्तींचा.”

रवी किशननेही व्यक्त केले दु:ख
खरं तर श्रीप्रदा भोजपुरी सुपरस्टार रवी किशनसोबत सन २०१५ मध्ये आलेल्या ‘हम तो हो गई नी तोहार’ मध्ये झळकल्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून रवी म्हणाला की, “खूपच दु:खद. त्या माझ्या सहअभिनेत्री होत्या. त्यांचा व्यवहार खूप चांगला होता आणि त्या विनम्र होत्या. देव त्यांच्या कुटुंबाला हे सर्व सहन करण्याची शक्ती देवो.”

या चित्रपटातही झळकल्या
श्रीप्रदा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन १९७८ मध्ये केली होती. त्या ‘पुराना पुरुष’, विनोद खन्ना अभिनित ‘धर्म संकट’ यांसारख्या चित्रपटातही झळखल्या. त्यांनी ‘बेवफा सनम’ आणि ‘आजमाइश’ यांसारख्या चित्रपटातही काम केले होते. श्रीप्रदा यांनी सन १९८९ मध्ये सुपरस्टार धर्मेंद्र आणि दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांच्या ‘बँटवारा’ या चित्रपटातही काम केले होते. यामधील त्यांच्या अभिनयाला सर्वांनी पसंत केले होते. श्रीप्रदा यांनी सन १९९३ मध्ये एक टीव्ही शोसाठीही पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जुही चावलाची मुलगी करणार बॉलिवूड पदार्पण? आयपीएल ऑक्शन दरम्यान झाली होती शाहरुख खानच्या मुलासोबत स्पॉट

-जुही चावलाची मुलगी करणार बॉलिवूड पदार्पण? आयपीएल ऑक्शन दरम्यान झाली होती शाहरुख खानच्या मुलासोबत स्पॉट

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते


Leave A Reply

Your email address will not be published.