राजकारणात एंट्री करणार थलपती विजय,तमिळनाडूमध्ये स्वतःची पार्टी लाँच करण्याची तयारी

तमिळचा सुपरस्टार थलपती विजय मध्यंतरी त्याच्या ‘लियो'(Leo) या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवरही छप्परफाड कमाईदेखील केली होती. त्यामुळे या चित्रपटासोबतंच थलपती विजयही मध्यंतरी फार चर्चेत होता. याच चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत असताना आता थलपती विजय चाहत्यांसाठी एक नवी बातमी घेऊन आल्याचे दिसत आहे. आता अभिनेता त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासोबतंच जनतेची सेवाही करताना दिसणार आहे. थलपती विजय लवकरंच राजकारणात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे.

थलपती विजय खुप काळापासुन स्वतःचा राजकिय पक्ष(Political Party) उभारण्याची तयारी करत होता. आता समोर येणाऱ्या बातम्यांवर जर विश्वास ठेवला तर अभिनेत्याने त्याचा स्वतःचा राजकिय पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सुत्राच्या माहितीनुसार विजयची पार्टीचा अध्यक्ष म्हणुन निवड केली आहे. मिडिया रिपोर्टनुसार विजयच्या राजकिय पक्षाची लवकरंच निवडणुक आयोगामध्ये नोंदणी होणार आहे.

रिपोर्टमध्ये पुढे असेही सांगितले आहे की, पार्टीच्या जनरल काउंसिलच्या 200 सदस्यांनी नोंदणीपुर्व झालेल्या मिटिंगमध्ये सहभाग नोंदवला होता. पक्षाच्या महासचिवाची आणि खजिनदाराची नियुक्ती झाली आहे. याचसोबत केंद्रिय कार्यकारी समिती देखील तयार केली आहे.विजयच्या राजकारणातील प्रवेश करण्याच्या बातम्यांविषयी एका सुत्राने सांगितले की,’ थलपती विजय(Vijay Thalapathy) तमिळनाडुमध्ये होणाऱ्या 2026च्या निवडणुकांपुर्वी राजकारणात प्रवेश करेल ‘ पार्टीचं संभाव्य नाव काय असेल असं विचारल्यावर त्याने सांगितले,’तमिळनाडुतील परंपरांना धरुनंचच पार्टीचं नाव ठरवलं जाईल.’

विजय थलपतीचा तमिळनाडुमध्ये खुप मोठा चाहतावर्ग आहे. तो नेहमीच गरजु लोकांची मदत करताना दिसतो. याबद्दल अधिक सांगायचं झालं तर डिसेंबर 2023मध्ये थुथुकुडी आणि तिरूनेलवेली या जिल्ह्यांतील पूरग्रस्त रहिवाशांची मदत केली होती. पूरग्रस्त लोकांमध्ये त्याने उपयोगी वस्तुंची वाट केली होती.

विजयचे वर्कफ्रंट
विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर 2023मध्ये विजय ‘लियो ‘ आणि ‘वरिसु'(Varisu) या चित्रपटात दिसला होता. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्याचं वर्किंग टायटल ‘थलपती 68′(Thalapathy 68) असं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन व्यंकट प्रभु करणार आहेत. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. विजयच्या चाहत्यांसाठी ही बातमी एखाद्या आनंदवार्तेसारखीच आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
शाहरुख खानसोबत कोलॅबोरेट करणार KGF फेम यश? यशच्या बाॅलिवूडमधील दुसऱ्या चित्रपटाची चर्चा!
बेस्ट सपोर्टिंग रोलसाठी शबाना आझमीला ऍवाॅर्ड,पुरुषांमध्ये विकी कौशलने केला कब्जा