×

‘पजामा पॉपस्टार’पासून ‘नॅशनल क्रश’ बनली, आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारायला सज्ज झालीय शर्ली सेटिया

तुम्हाला नॅशनल क्रश शर्ली सेटिया (Shirley Setia) आठवतेय का? ‘आशिकी २’मधील ‘तुम ही हो’ गाण्याचे कव्हर व्हर्जन गाणारी शर्ली रातोरात प्रसिद्ध झाली होती. युट्युबच्या प्रवासानंतर शर्ली आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. शर्ली सेटियाची गाणी तुम्ही अनेकदा ऐकली असतील. पण तुम्हाला माहीत आहे का, की ती लहान वयातच इतकी प्रसिद्ध कशी झाली? शर्लीच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

View this post on Instagram

A post shared by Shirley (@shirleysetia)

टी-सिरीजची जिंकली स्पर्धा
शर्ली सेटियाचा जन्म दमण येथे झाला, परंतु ती तिच्या पालकांसह न्यूझीलंडला स्थायिक झाली. त्यानंतर शर्लीने तिथूनच शिक्षण घेतले आणि ऑकलंड विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर तिने टी-सिरीजने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला आणि तिच्या बेडरूममधून तिचा पायजमा परिधान केलेला एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या स्पर्धेत ती विजेती ठरली आणि तिला न्यूझीलंड हेराल्डने ‘पजामा पॉपस्टार’ हे टोपण नाव दिले होते. (lesser know facts about youtube sensation and nikamma actress shirley setia)

View this post on Instagram

A post shared by Shirley (@shirleysetia)

वयाच्या १६व्या वर्षी केले पहिले गाणे अपलोड
शर्लीने वयाच्या १६ व्या वर्षी युट्यूबवर पहिले गाणे अपलोड केले. यानंतर हळूहळू यूट्यूबवर तिची आणखी गाणी येऊ लागली. ‘आशिकी २’ मधील ‘तुम ही हो’ हे गाणे त्यावेळी खूप प्रसिद्ध झाले होते आणि शर्लीने तेच गाणे तिच्या खास शैलीत गायले. याच गाण्यामुळे ती रातोरात नॅशनल क्रश बनली. शर्ली केवळ यूट्यूबच नाही, तर स्टेज शो देखील करते. शर्लीने तिचे पहिले काही शो मुंबई आणि हैदराबादमध्ये केले होते. तिच्या आवाजाची जादू सगळ्यांनाच आवडते, पण ती तिच्या क्यूटनेसनेही चाहत्यांची मने जिंकते.

View this post on Instagram

A post shared by Shirley (@shirleysetia)

‘निकम्मा’मधून करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
शर्लीने फोर्ब्स मॅगझिनमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. मॅगझिनने तिला ‘बॉलिवूड नेक्स्ट बिग सिंगिंग सेन्सेशन’ असे नाव दिले. शर्ली नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘मस्का’मध्ये दिसली आहे आणि आता ती ‘निकम्मा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्री भाग्यश्रीचा (Bhagyashree) मुलगा अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) आणि समीर सोनीही (Sameer Soni) तिच्यासोबत ‘निकम्मा’मध्ये दिसणार आहेत. शर्लीने ‘तेरे नाल रहना’, ‘केई वी नहीं’, ‘नईयो जाना’ सारखी अनेक गाणीही गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post