Wednesday, August 6, 2025
Home अन्य असीम रियाझ आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; ‘बिग बॉस’नंतर बनवली वेगळी ओळख

असीम रियाझ आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; ‘बिग बॉस’नंतर बनवली वेगळी ओळख

‘बिग बॉस 13’ स्पर्धक आणि रनरअप विजेता असीम रियाझ याने बिग बॉसनंतर त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. त्याला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. बिग बॉसनंतर त्याच्या आयुष्यात एक वेगळाच बदल झाला आहे. त्याला अनेक ऑफर आल्या.

बिग बॉसनंतर असीम अनेक ब्रँड एंडॉर्स केले आहेत आणि अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील तो दिसला आहे. असीम आणि हिमांशी खुराणा यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. मंगळवारी (13 जुलै) असीम त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 13 जुलै, 1993 मध्ये झाला आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्या बाबत काही खास गोष्टी. (Let’s know about asim Riaz net worth)

माध्यमातील वृत्तानुसार, असीमचे नेट वर्थ जवळपास 10 कोटी एवढे आहे. ‘बिग बॉस 13’ मध्ये भाग घेण्याआधी त्याने अनेक मॉडेलिंग असाईनमेंट केल्या होत्या.

असीम ‘मैं तेरा हिरो’ या चित्रपटात वरुण धवनसोबत दिसला आहे. त्याने वरुण धवनसोबत फायटिंग सीन केला होता. या चित्रपटातील हा सीन तो बिग बॉसच्या घरात गेल्यावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्याला ओळखणे चाहत्यांसाठी खूप अवघड होते.

‘बिग बॉस 13’ नंतर त्याचा जॅकलिन फर्नांडिस सोबत ‘मेरे अंगने मे’ हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आले होते. यासोबतच तो हिमांशी खुराणासोबत अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये तो दिसला आहे.

असीम आणि हिमांशी बिग बॉसमध्ये एकत्र दिसले होते. शोमध्ये त्याने हिमांशी प्रती असलेल्या त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या दोघांना अनेकवेळा सोबत पाहिले जाते. त्या दोघांचे चाहते त्यांना खूप पसंत करतात. त्यांच्या व्हिडिओ आणि फोटोवर चाहते सातत्याने प्रतिक्रिया देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करून दिल्या पत्नीला शुभेच्छा

-अली गोनीकडे सध्या नाहीये कोणताच प्रोजेक्ट; वाढलेलं वजन आहे का यामागचं कारण??

-‘मी अंतर्वस्त्र घालायचे की नाही, ही माझी चॉईस…’, कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीने दिली जोरदार चपराक

हे देखील वाचा