Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड बापरे! समुद्राच्या उंचच उंच लाटांवर अभिनेत्री घेत होती भरारी, अचानक घडली धक्कादायक घटना

बापरे! समुद्राच्या उंचच उंच लाटांवर अभिनेत्री घेत होती भरारी, अचानक घडली धक्कादायक घटना

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) सुपरहिट चित्रपट ‘क्वीन’ चांगलाच हिट झाला. यात महत्वाची भूमिका साकारणारी लिसा हेडन (Lisa Haydon) भलतीच भाव खाऊन गेली. अभिनेत्री अजूनही सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधत असते. बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दाखवणारी लिसा हेडन सध्या तिच्या वैवाहिक जीवन चांगलीच रमली आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

वेबसर्फिंग दरम्यान झाला अपघात
लिसा हेडनने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती अतिशय दमदार स्टाईलमध्ये उंचच उंच लाटांमध्ये वेब बोर्डवर सर्फिंग करताना दिसत आहे. तिची स्टाईल इतकी परफेक्ट आहे की, ती न घाबरता प्रत्येक लाटेशी लढायला तयार दिसते. पण त्याच दरम्यान एका लाटेत तिचा तोल बिघडला आणि ती थेट समुद्रात बुडताना दिसली. (lisa haydon was websurfing in the high waves of the sea and dangerous accident)

कॅप्शनने दिला चाहत्यांना दिलासा
हा व्हिडिओ शेअर करत लिसा हेडनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “३६०चा पहिला प्रयत्न, पण १८० जबरदस्त झाला.” खरं तर, लिसा बोर्डवरच फिरण्याचा सराव करत होती आणि ते करताना ती पडली, म्हणून तिने या प्रयत्नाचे अपयश मजेशीर पद्धतीने शेअर केले.

‘वॉटर बेबी’ आहे लिसा
लिसा हेडनला समुद्रात पराक्रम करताना पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. ती अनकेदा समुद्राच्या पाण्यात खेळताना दिसते. तर बऱ्याचदा ती बीचवर सूर्यस्नान करताना तिच्या मुलांसोबतचे फोटो शेअर करते. त्यामुळेच तिचे चाहते तिला ‘वॉटर बेबी’ म्हणतात.

२०१६ मध्ये झालंय लग्न
जूनमध्ये लिसा हेडन तिसऱ्यांदा आई बनली. यावेळी तिने एका मुलीला जन्म दिला. आ‍ॅक्टोबर २०१६ मध्ये लिसाने तिचा बॉयफ्रेंड डिनो लालवानीसोबत लग्न केले होते. हे जोडपे वर्षभर डेट करत होते. लिसाने २०१७ मध्ये मुलगा जॅकला जन्म दिला. दुसरा मुलगा लिओचा जन्म २०२० मध्ये झाला.

हेही वाचा- 

हे देखील वाचा