Wednesday, July 16, 2025
Home वेबसिरीज पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात वाजणार सनईचे सूर, संग्राम सिंगने पायल रोहितगीला घातली लग्नाची मागणी

पुन्हा एकदा मनोरंजनविश्वात वाजणार सनईचे सूर, संग्राम सिंगने पायल रोहितगीला घातली लग्नाची मागणी

कंगना रणौतचा शो लॉकअप दिवसेंदिवस अधिकच रंगात येत असून, गाजताना देखील दिसत आहे. भांडणं, वाद, प्रेम, हैराण करणारे खुलासे आदी अनेक गोष्टींमुळे हा शो तुफान लोकप्रिय होत आहे. सध्या या शोमध्ये फॅमिली वीक चालू असून, स्पर्धकांचे कुटुंबातील लोकं त्यांना या आठवड्यात भेटायला येणार आहे. यातच अभिनेत्री, मॉडेल असणाऱ्या पायल रोहितगीला भेटण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंग येणार आहे.

सध्या या शोचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये संग्राम पायलला भेटण्यासाठी शोमध्ये आला असून, तो या शोमध्ये तिला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. संग्राम पायलला म्हणतो की, “लॉकअप शोमधील अर्धे कैदी मुलीकडून येतील तर अर्धे कैदी मुलाकडून येतील. हा लॉकअप शो तू संपव मग आपण लग्न करू.” हे ऐकल्यावर पायल लाजते आणि लाजतच त्याला विचारते की, “तू या निर्णयावर ठाम आहेस?” यावर संग्राम म्हणतो, “नक्कीच”

संग्राम पुढे पायलचे कौतुक करतांना म्हणतो की, “एवढी धाकड, एवढी स्ट्रॉंग, एवढी स्वावलंबी, एवढी मजबूत मुलगी मी अजिबातच सोडू इच्छित नाही. या मुलीसोबत मला आयुष्यभर लॉकइन व्हायचे आहे.” संग्रामच्या तोंडून हे ऐकल्यावर पायल लाजेने लाल होते. तर इतर कैदी स्पर्धक एकच कल्ला करतात.

तत्पूर्वी पायल आणि संग्राम हे मागील १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांची भेटही रियॅलिटी शोमध्येच झाली होती. संग्राम आणि पायल अनेकदा विविध कार्यक्रमांना एकत्र पाहिले जातात. आता या प्रपोजल नंतर दोघांच्याही फॅन्सला त्यांच्या लग्नाची आतुरता लागली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा