×

Lock UPP | पूनम पांडेही लॉकअपमध्ये? एक चूक आणि मिळाली ‘इतकी’ भयानक शिक्षा

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी ‘लॉकअप’ कार्यक्रमामुळे सर्वत्र चर्चेत आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेली अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Panday) आत्तापासूनच आपल्या बोल्डनेसचा तडका लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम चांगलाच गाजणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कंगना रणौतच्या ‘लॉकअप’मध्ये सहभागी कलाकारांची यादी या आधीच समोर आली होती. या यादीवरूनच कार्यक्रमात धमाल पाहायला मिळणार असल्याची सगळ्यांनी चर्चा सुरू केली होती. या कार्यक्रमात पूनम पांडे, उर्फी जावेद, अनुष्का सेन, शहनाज गिल, अशा अनेक आघाडीच्या अभिनेत्री सहभागी झाल्या आहेत. त्यामुळेच हा कार्यक्रम वाद आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आता पूनम पांडेने त्याची सुरुवात ही केली आहे ज्याचा प्रोमो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अभिनेत्री पूनम पांडे कैद्याच्या कपड्यात असूनही बोल्ड दिसत आहे. यावेळी ती तिच्या शर्टची चैन खोलताना दिसत आहे, 6ज्यामुळे ती खूपच बोल्ड आण आणि मादक दिसत आहे. मात्र त्याचवेळी कार्यक्रमात कंगना रणौत दमदार भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. कारण पूनम पांडेच्या अशा वागण्याने तिने लगेच तिला हातात बेड्या घालून लॉकअप मध्ये घालते. ज्यामुळे पूनम खूपच संतापलेली दिसत आहे. हा प्रोमो सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामुळे या कार्यक्रमाची आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

तत्पूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे हॉट बोल्ड फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. कधी फोटो मुळे तर कधी आपल्या बोलण्याने ती नेहमीच सोशल मीडियावर झळकत असते. यामुळे तिला अनेकदा ट्रोल ही केले आहे. आता पूनम लॉकअप मध्ये काय ड्रामा करणार यावीच उत्सुकता लागली आहे.

हेही पहा –

Latest Post