Friday, April 19, 2024

ब्रेकिंग! बाॅलिवूडला हादरा! प्रख्यात अभिनेते अरूण बाली काळाच्या पडद्याआड

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. अरूण बाली हे गेल्या अनेक न्योरो नावाच्या आजाराशी झुंज देत होते. त्यांना गेल्या महिन्यातच दवाखान्यात भरती केले होते. यांच्या अचानक निधनाच्या बातमीने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी (7 ऑक्टोबर) रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांनी शेवटचे काम ‘गुडबाय’ (Goodbye) या चित्रपटामध्ये काम केले होते. जो आजच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. मात्र, ही दु:खाची गोष्ट आहे की, त्यांनी आजच्या दिवशाच जगाला राम राम ठोकला.

 अरुण बाली यांचा जन्म 1942 साली पाकिस्तानच्या लाहौर गावामध्ये झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये चित्रपटच नाही तर टेलिव्हिजन आणि पंजाबी चित्रपटामध्ये देखिल छाप सोडली आहे. त्यांनी नेहमी चरित्रा भूमिका केल्या आहेत.  त्यांनी बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध कलारांसोबत काम केले आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘सौगंध’ जो 1991  मध्ये प्रदर्शित झाला असून बाली यांनी या चित्रपटामधून पदार्पण केले होते. या शिवाय त्यांनी 1989 मध्ये दुसरा केव या टेलिव्हिजवरील कार्यक्रमामध्ये काम केले होते. याच वर्षी प्रदर्षित होणारा कारयक्रम तलाश मध्ये देखिल त्यांनी आपली छाप सोडली होती.

‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ आदी टीव्हीवरील नाटकांत तर ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’, ‘पानीपत’ ‘मनमर्जियां’, ‘पीके’, ‘बर्फी’ सारख्या तब्बल 40 चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील एक तारा निखळला आहे. ( Veteran actor Arun Bali passes away at age of 79 years in Mumbai )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा –
वाईट वाटतं राव! वडिलांवर झालेला विनोद सहन करू शकला नाही अभिषेक, शो मध्येच सोडून गेला निघून
आपल्या अशा वक्तव्यामुळे ‘या’कलाकारांनाही करावा लागला होता ट्रोलिंगचा सामना, एकदा पहाच यादी

हे देखील वाचा