Saturday, April 20, 2024

अनुपम खेर यांनी चौपाटीवर महिला सफाई कामगारासोबत केला डान्स, व्हिडिओ जोरदार व्हायरल

बॉलिूेड अभिनेता अनुपम खेर हे आपल्या अभिनयामुळे तर ओळखलेच जातात. मात्र ते समाजामध्ये होणाऱ्या अनेक गोष्टींवर ठामपणे आपले विचार व्यक्त करत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत नेहमी जोडलेले असतात. ते सोशल मीडियालर खूप सक्रिय असतात आणि नेहमी काही ना काही शेअर करत असतात. आज ते जुहु बीचवर गेले होते. तेव्हा तिथे त्यांना एक सफाइ कामगार महिला भेटली होती. अभिनेताने या महिलेसोबत धमाकेदार डान्स करत असताना कोणीतरी व्हिडिओ बनवला होता. आता हा व्हिडिओ अनुपम खेर यांना आपल्या अधिकृत इंनस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जाणून घ्या पूर्ण माहिती.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुपम खेर(Anupam Kher) भर गर्दीमध्ये एका सफाई कामगार महिलेसोबत जोरदार डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला शेअर करत एक कॅप्शन दिले आहे, “काही दिवसापूर्वी मी जुहु बीचवर स्वच्छता अभियान द्वारे गेलो होते, तिथे माझी ओळख एका बीएमसी महिला कामगाराशी झाली हेती. तिने सांगितले की मला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे!, मी म्हणाले की मला तुमच्यासोबत डान्स करायचा आहे. आम्ही काहीच विचीर न करता बेधुंद डान्स करु लागलो आणि तेवढ्यात कोणीतरी हा व्हिडिओ बनवून मला पाठवला होता तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शेअर करत स्वत:चा अनुभव तर सांगितलाच आणि त्या महिलाच्या हिमतीचीही प्रशंसा करत लिहिले आहे की, “या महिलेच्या जिद्दीला सलाम. जय हो.” सध्या या व्हिडिओला पाहून चाहते खूपच खूष आहेत आणि आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनुपम खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाय झाले तर यांच्या हातामध्ये सध्या लगादार चित्रपट आहेत. नुकतच त्यांनी 530 वे चित्रपच साइन केले आहे. ते शेवता बसू सोबत शॉर्टफिल्मा मध्ये पहायला मिळणार आहेय या व्यतीरिक्त अनुपम खेर कंगना राणावत(Kangana Ranaut) सोबत ‘एमरजेन्सी’ चित्रपटामध्ये मुख्या भुमितेक दिसणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
अभिनेत्री बनण्यासाठी घरातून गेल्या होत्या पळून, ‘असा’ आहे उषा नाडकर्णी यांचा जीवन प्रवास
शेतात काम करणारी ६२ वर्षीय आजी ‘अशी’ बनली युट्युबर, वाचा तिची कहाणी
सैफ अली खानच्या ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातलेला धुमाकुळ, एकदा यादी वाचाच

 

 

हे देखील वाचा