Sunday, April 14, 2024

बायोपिक तर येणार पण ‘ती’ घटना दाखवणे टाळणार, अभिनेत्री मधुबालांच्या बायोपिकबद्दल बहिणीने केला मोठा खुलासा

हिंदी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटांची आणि  अभिनयाची आजही चर्चा होताना दिसत असते. यांपैकीच एक आघाडीची अभिनेत्री म्हणून मधुबाला (Madhubala ) यांचे नाव घेतले जाते. हिंदी सिने जगताला पडलेल सुंदर स्वप्न अशा शब्दात अभिनेत्री मधुबालांच्या कार्याचा गौरव केला जातो. सध्या मधुबाला यांच्यावरील बायोपिक बनवण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता त्यांच्या या बायोपिकबद्दल त्यांच्या बहिणीने मोठा खुलासा केला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.  

दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खरंतर, मधुबालाच्या बायोपिकवर काम जोरात सुरू आहे. त्याचवेळी, या बायोपिकशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा खुद्द दिवंगत अभिनेत्रीची बहिण मधुर भूषण यांनी केला आहे. मधुरच्या म्हणण्यानुसार, तिचे वैयक्तिक आयुष्य म्हणजेच तिचे दिलीप कुमारसोबतचे अफेअर आणि किशोर कुमारसोबतचे तिचे समीकरण मधुबालाच्या बायोपिकमध्ये दाखवले जाणार नाही. अभिनेत्रीचे लग्न किशोर कुमारसोबत झाले होते आणि असे म्हटले जाते की, लग्नानंतर मधुबालाच्या आजारपणाच्या काळात किशोर कुमार यांनी  तिला पूर्णपणे एकटे सोडले होते. त्याच वेळी, किशोर कुमार यांच्याशी  लग्न करण्यापूर्वी, मधुबाला दीर्घकाळ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याचीही चर्चा त्या काळात रंगली होती.

तथापि, मधुरच्या नुकत्याच झालेल्या खुलाशानंतर, मधुबालांच्या बायोपिकमध्ये दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्याशी संबंधित घटनांचा उल्लेख केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मधुबालाची कथा सांगताना, आम्हाला कोणाला दुखवायचे नव्हते, दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्याशी मधुबालाचे नाते कसे होते याकडे आम्हाला जायचे नव्हते कारण शेवटी त्यांचेही कुटुंब, पत्नी आणि मुले आहेत.’

मधुर पुढे सांगतात की, ‘प्रत्येक नात्यात चढ-उतार असतात, ज्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांबद्दल कोणीही काही बोलू नये असे आपल्याला वाटत असते, त्याचप्रमाणे दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्या कुटुंबालाही कोणी असे नको आहे. मधुबाला यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी हृदयविकाराशी लढा देत १९६९ साली या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा