ऐकलंंत का मंडळी! आधीपासून विवाहित असलेल्या व्यक्तींशी केले ‘या’ अभिनेत्रींनी लग्न, मधुबालाचाही समावेश


हिंदी सिनेजगात कोणाच्या जोड्या कशा जमतील याचा काही नेम नाही. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपला विवाह आपल्यापेक्षा वयाने खूप मोठ्या असलेल्या पुरुषाशी केला आहे, ते फक्त वयानेच मोठे नसून त्यांचा आधीही विवाह झाला होता, पण म्हणतात ना प्रेमापुढे काहीच दिसत नाही, ते अगदी खरे आहे. आज आपण अशाच काही प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आधीच विवाहित असलेल्या पुरुषाशी लग्न केले आहे.

मधुबाला
हिंदी सिनेमाच्या इतिहासात आतापर्यंतची सर्वात सुंदर अभिनेत्री असलेल्या मधुबाला यांनी दोन वेळेस विवाहित असलेल्या गायक किशोर कुमार यांच्याशी लग्न केले होते. त्यावेळी दिलीप कुमार यांच्यासारख्या अनेकजणांच्या पदरी निराशा आली. वयाच्या ३६व्या वर्षी हृदयाला असलेल्या छिद्रामुळे, मधुबाला यांचा मृत्यू झाला. त्यावेळी किशोर कुमार यांनी मधुबाला यांची खूप सेवा केली होती.

वैजयंती माला
राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्याशी प्रेमाचा छोटा डाव खेळल्यानंतर, वैजयंती माला यांनी राज कपूर यांचे मित्र डॉ. बाली यांच्याशी लग्न केले. हेच डॉ. बाली राज कपूर यांचे प्रेमपत्र वैजयंतीमाला यांना पोहोचवायचे.

हेमा मालिनी
संजीव कुमार हे स्वप्न सुंदरी म्हणजेच ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीशी लग्न करण्यास तयार होते, आणि जितेंद्र यांनी हेमा यांच्या आईला लग्नासाठीही तयार केले होते. तेही त्यांचे अफेअर शोभा यांच्याशी चालू असताना. परंतु चित्रपटाच्या अंदाजात धर्मेंद्र यांनी शोभासमवेत मद्रास गाठले, आणि आधीच विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांनी कायदेशीर अडथळे टाळण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. हेमा यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करत, धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला. आजही हेमा यांना धर्मेंद्रच्या कौटुंबिक कार्यक्रमात आमंत्रित केले जात नाही.

श्रीदेवी
बॉलिवूडची ‘चांदनी’ श्रीदेवी यांनी चित्रपट निर्माते, बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते. यापूर्वी बोनी यांचे १९८३मध्ये लग्न झाले होते. बोनी कपूर यांचे हे दुसरे लग्न होते. बोनी कपूर यांना पहिल्या पत्नीपासुन अर्जुन आणि अंशुला दोन मुले आहेत, तर श्रीदेवीला दोन मुली आहेत.

विद्या बालन
या यादीत विद्या बालनचेही नाव आहे. विद्या बालनने यूटीव्ही चीफ सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्न केले आहे. वृत्तानुसार, २०१२ साली विद्याचे लग्न झाले. विद्याशी लग्न करण्यापूर्वी सिद्धार्थने दोन लग्न केले होते.

राणी मुखर्जी
प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीने चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केले आहे. २००१ मध्ये प्रथम आदित्य यांनी पायल खन्नासोबत लग्न केले होते. आदित्य चोप्राने २०१४ मध्ये राणी मुखर्जीशी, लग्न करून सर्वांना चकित केले होते.

शिल्पा शेट्टी
या यादीमध्ये बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीही येते. शिल्पाचे राज कुंद्राशी लग्न झाले आहे. राजने शिल्पासाठी पहिली पत्नी कविता कुंद्राशी घटस्फोट घेतला होता. राज आणि शिल्पाला मुलगा जीवन आणि मुलगी समिशा आहे. शिल्पा बर्‍याचदा मुलांसमवेत सोशल मीडियावर आपली छायाचित्रे पोस्ट करत असते.

करीना कपूर खान
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूरनेही विवाहित व्यक्तीची पती म्हणून निवड केली आहे. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग होती. अमृताशी घटस्फोट झाल्यानंतर, सैफला करीना आवडू लागली. सैफ आणि करीनाला तैमूर नावाचा मुलगा आहे. तैमूर हा त्याच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. फेब्रुवारीमध्ये करीनाने आणखी एका मुलाला जन्म दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वैजयंती माला यांना नव्हते करायचे चित्रपटात काम, एका डान्स परफॉर्मन्सने बदलले आयुष्य

-प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.