‘डान्स दीवाने ३’च्या सेटवर माधुरी दीक्षित अन् जॅकी श्रॉफ यांनी रिक्रिएट केला रोमँटिक सीन; एकदा पाहाच


टेलिव्हिजनवरील ‘डान्स दीवाने 3’ हा डान्स रियॅलिटी शो खूपच लोकप्रिय आहे. प्रेक्षकदेखील या शोमधील स्पर्धकांना आणि त्यांच्या डान्सला भरभरून प्रतिसाद देत असतात. या शोमध्ये नेहमीच काहीतरी रंगतदार गोष्टी घडत असतात. त्यामुळे या शोचा चाहता वर्ग जास्त आहे. हा वीकेंड देखील खूप शानदार असणार आहे. कारण या वीकेंडला डान्स दीवानेच्या मंचावर जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी येणार आहेत. ते दोघेही या शोची परीक्षक माधुरी दीक्षितसोबत मस्ती करताना दिसणार आहेत. याच वेळी जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित एका चित्रपटाचा सीन देखील रिक्रिएट करणार आहेत. (Madhuri Dixit and Jackie Shroff recreat guide movies romantic seen)

कलर्सने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या एपिसोडचे काही प्रोमो शेअर केले आहेत. या प्रोमोमध्ये धर्मेश, राघव, तुषार आणि तिन्ही स्टार्स मंचावर दिसत आहेत. ते सुनील शेट्टीच्या ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटातील ‘ऐ मेरी झोहरा जबीं” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत, तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित ‘गाईड’ चित्रपटातील रोमँटिक सीन रिक्रिएट करताना दिसत आहेत.

याच वेळी जॅकी श्रॉफ माधुरी दीक्षितसोबत ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच आवडली आहे.

प्रोमोमध्ये या शोचा होस्ट राघव हा जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांना काही मजेशीर प्रश्न विचारतो. राघव त्यांना विचारतो की, तुमच्या दोघांपैकी तुमच्या पत्नीला सर्वात जास्त कोण घाबरतं? यावर जॅकी श्रॉफ म्हणतात की, “फक्त नाव दादा आहे भिडू.” राघव विचारतो की, जर चित्रपटात सुंदर अभिनेत्री असेल, तर फी कमी करायला कोण तयार होत?? यावर सुनील शेट्टी उत्तर देतो की, “मी तर फीस घेतचं नाही.” या शोचा प्रोमो एवढा मजेदार आहे तर विचार करा एपिसोड किती मजेशीर असेल. प्रेक्षक आता हा एपिसोड बघण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.