बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) तिच्या जबरदस्त अभिनयासाठी ओळखली जाते. तिने बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहे. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. माधुरी ही ८० आणि ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री आहे. तिच्या डान्स आणि सौंदर्यामुळे आजही तिची जागा कोणी घेऊ शकलेले नाही. पण एक काळ असा होता की, माधुरी दीक्षित हिरोईनसारखी दिसत नाही, असे सांगण्यात आले होते. खुद्द माधुरी दीक्षितने याचा खुलासा केला आहे. नंतर ती सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक बनली आणि तिने तिच्या कारकिर्दीत एकामागून एक हिट चित्रपट दिले आहेत.
माधुरी दीक्षित लोकांना हिरोईनसारखी वाटत नव्हती
एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याचा खुलासा केला. ती म्हणाली की, “लोक म्हणायचे की, मी हिरोईन दिसत नाही. कारण तेव्हा मी एक तरुण मुलगी होते, जी महाराष्ट्रीयन होते आणि लहान होते. हिरोईन कशी असावी, असा एक समज सर्वांच्या मनात होता. मला काही अडचणींचा सामना करावा लागला. माझी आई खूप मजबूत स्त्री होती. तिने मला सांगितले की, तू चांगले काम कर, तुला नक्कीच ओळख मिळेल. तिची सूचना मी नेहमीच मान्य केली. ती म्हणाली होती की, यश मिळाले तर बाकीचे सगळे विसरतील.”
माधुरी दीक्षितने १९८४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण १९८८ मध्ये आलेल्या ‘तेजाब’ या सिनेमातून अभिनेत्रीला यश मिळाले. या चित्रपटात माधुरीसोबत अनिल कपूरही (Anil Kapoor) मुख्य भूमिकेत होते. यानंतर माधुरीने एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. आज माधुरीची गणना इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांमध्ये केली जाते. माधुरीने तिच्या करिअरमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकली आहेत.
ओटीटीवर केले पदार्पण
माधुरी दीक्षितने अलीकडेच ‘द फेम गेम’ या वेबसिरीजद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत संजय कपूरही (Sanjay Kapoor) आहे. आठ भागांच्या या सीरिजमध्ये माधुरी दीक्षित एका सुपरस्टार अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे, जी अचानक गायब होते. चित्रपट निर्माते श्री राव यांनी या शोची निर्मिती केली आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. यात माधुरी दीक्षित, संजय कपूर व्यतिरिक्त मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुला आणि मुस्कान जाफरी यांच्याही भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा