Tuesday, February 4, 2025
Home बॉलीवूड ‘साजन’ चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण: माधुरी दीक्षितने उर्मिला मातोंडकरसह साजरा केला खास क्षण

‘साजन’ चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण: माधुरी दीक्षितने उर्मिला मातोंडकरसह साजरा केला खास क्षण

अभिनेत्री माधुरी दीक्षितने ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीवर राज्य केले होते. ती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पैकी एक आहे. तिच्या अभिनयाने माधुरी प्रेक्षकांमध्ये सर्वात आवडत्या स्टार्सपैकी एक बनली. अलीकडेच माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकरसोबत तिच्या ‘साजन’ या चित्रपटातील ‘तू शायर है’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. माधुरीच्या ‘साजन’ या चित्रपटाला रिलीझ होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने माधुरीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत संजय दत्त आणि सलमान खान दिसले होते.

माधुरीने हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ शेअर करताना माधुरीने लिहिले की, ‘माझ्यासोबत माझा चित्रपट साजनची ३० वर्षे साजरी केल्याबद्दल धन्यवाद.” या व्हिडिओला आतापर्यंत ९० हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून असे लक्षात येते की, उर्मिला मातोंडकर ‘डान्स दिवाने’ शोच्या आगामी भागात दिसणार आहेत. (Dhakdhak Girl celebrates 30 years of ‘Saajan’ movie, video posted)

अलीकडेच जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिचा एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. ज्यात ती अतिशय सुंदर अंदाजात नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये माधुरीची स्टाइल चाहत्यांना वेड लावत आहे. नेहमीप्रमाणे, माधुरी दीक्षित या व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसत आहे. लगानमधील ‘किसलीये राधा जले’ या गाण्यावर माधुरी दीक्षित उत्तम एक्सप्रेशन देताना दिसून येत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही सध्या ‘डान्स दिवाणे ३’ या शोची परीक्षक आहे. माधुरी या अगोदरच्या ही सीझनमध्ये परीक्षक होती. त्याचबरोबर तिचा शेवटचा चित्रपट ‘टोटल धमाल’ हा होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा