Monday, December 30, 2024
Home बॉलीवूड लग्नाच्या आधी माधुरी दीक्षितच्या पतीला माहित नव्हते तिचे सगळ्यात मोठे सिक्रेट, सत्य समजताच झाले शॉक

लग्नाच्या आधी माधुरी दीक्षितच्या पतीला माहित नव्हते तिचे सगळ्यात मोठे सिक्रेट, सत्य समजताच झाले शॉक

बॉलिवूड सुपरस्टार माधुरी दीक्षितला (Madhuri dixit) आज कोण ओळखत नाही? माधुरीला पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरमध्ये रांगा लावल्या होत्या. बॉलिवूडमध्ये उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या माधुरीचे नाव प्रत्येक मुलाला माहीत आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की माधुरीचे पती डॉ.श्रीराम नेने हे माधुरीला ओळखत नव्हते. होय, माधुरी दीक्षितसोबतच्या लग्नानंतर डॉ. नेने यांच्यासमोर एक गुपित उघड झाले होते, जे जाणून त्यांना धक्काच बसला होता.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे यूएसस्थित हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सर्जन आहेत. माधुरीची डॉक्टर नेनेंशी पहिली भेट अमेरिकेतच झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधुरी दीक्षितचा भाऊ अजित दीक्षितच्या एका पार्टीत डॉ. नेने आणि माधुरी दीक्षित पहिल्यांदा भेटले होते. यानंतर हळूहळू माधुरी आणि नेने एकमेकांना आवडू लागले.

माधुरीने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, माधुरीने चित्रपटात काम केले आहे याची डॉ. नेने यांना कल्पना नव्हती. ती त्याला सामान्य मुलीसारखी भेटली. माधुरीला ही गोष्ट आवडली की डॉक्टर नेने तिला एक व्यक्ती म्हणून आवडू लागले होते. माधुरी आणि डॉ. नेने यांचा विवाह 17 ऑक्टोबर 1999 रोजी अमेरिकेत केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाला. मात्र नंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी ऐकून बॉलीवूडमधील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिलेल्या बड्या बॉलीवूड स्टार्सपैकी डॉ. नेने फक्त मेगास्टार अमिताभ बच्चन यांनाच ओळखू शकले आणि माधुरी ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे हे जाणून त्यांना आश्चर्य वाटले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
…म्हणून ‘जवान’ चित्रपटात दीपिकाने साकारली शाहरुख खानच्या आईची भूमिका, जाणून घ्या मोठे कारण
प्रियांका आधी ‘या’ हॉलिवूड सुंदरी होत्या निक जोनासच्या गर्लफ्रेंड, वाचा यादी

हे देखील वाचा