फोटो शेअर करून माधुरी दीक्षितने मानले ‘या’चे आभार; म्हणाली, ‘मी आज जे आहे…’


आपल्या स्माईलने, सौंदर्याने, अभिनयाने सर्वांना तिच्या प्रेमात पाडणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय. माधुरी ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या चाहत्यांना भुरळ घालण्याची एकही संधी ती सोडत नाही. तिच्या लोकप्रियतेचा अंदाज इथूनच लावू शकतो की, तिचा कोणताही फोटो आणि व्हिडिओ शेअर होता क्षणीच मोठ्या संख्येने व्हायरल होत असतो. खरंतर माधुरीने तिचे नाव कमावण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माणूस आपल्या माणसांचे आभार मानतो, एखाद्या परिस्थितीचे आभार मानतो. पण माधुरीने तिच्या मेहनतीचे आभार मानले आहेत. तिचा एक फोटो प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडला आहे. हा फोटो शेअर करून तिने तिच्या मेहनतीचे आभार मानले आहे.

माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या आणि काळ्या कॉम्बिनेशनमध्ये एक ड्रेस घातला आहे. तसेच तिने डोळ्यांवर चष्मा लावला आहे. तिच्या या फोटोवरून जाणवत आहे, की ती कुठेतरी फिरायला गेली आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मी माझ्या ज्या मेहनतीमुळे आज जे काही आहे, त्या मेहनतीचे मी आभार मानते.” (madhuri dixit share a photo and thanful for her struggle days )

तिचा हा फोटो आणि हे कॅप्शन सर्वांना खूप आवडले आहे. या वयातही अनेक तरूण अभिनेत्रींना लाजवेल असे माधुरीचे सौंदर्य आहे. या वयातही तिचा फिटनेस पाहण्यासारखा आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सध्या ती ‘डान्स दीवाने ३’ या शोला जज करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

-निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं मृण्मयी देशपाडेचं रूप, फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.