माधुरी दीक्षित अभिनित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात अभिनेत्री रितिका श्रोत्रीदेखील झळकली होती. चित्रपटात तिच्या अभिनयाचे देखील बरेच कौतुक झाले होते. ती चाहत्यांमध्ये तिच्या निरागस सौंदर्यासाठी ओळखली जाते. नेहमी आपले सुंदर सुंदर फोटो ती चाहत्यांसमोर सादर करत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या या अभिनेत्रीने नुकताच तिचा फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
रितिका श्रोत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून जे फोटो शेअर केले आहेत, ते सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारणही तसेच आहे. यात रितिका साडीमध्ये दिसली आहे. ती अगदी पारंपारिक लूक करून तयार झालेली दिसत आहे. सोबतच पारंपारिक दागिने रितिकाच्या सुंदरतेमध्ये आणखी भर घालत आहेत.
हा सुंदर फोटो शेअर करत, रितिकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एखादी साडी तुम्हाला कधीच सूट करायला सांगत नाही, मात्र यामुळे तुम्ही उभे राहायला प्रोत्साहित होता!” याशिवाय कॅप्शनमध्ये तिने साडी आईची असल्याचेही सांगितले आहे. नेटकऱ्यांकडून फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे. अनेक जणांनी फोटोवर कमेंट करून, तिच्या सुंदरतेचे कौतुक केले आहे.
रितिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘गुंतागुंत हृदय’ या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारून, अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ती बऱ्याच मालिकेमध्ये दिसली. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे ती प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकली. तसेच २०१५ साली आलेल्या ‘स्लॅमबुक’ चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. याशिवाय रितिका लवकरच ‘डार्लिंग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-