बॉलिवूडमध्ये ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय बनत असते. अभिनेत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले मत परखडपणे व्यक्त करते. याच स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. या सगळ्याशिवाय अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. कंगना गीतकार जावेद अख्तर यांच्या सोबतच्या वादामुळेही चर्चेत आहे. जावेद अख्तर यांच्या बदनामीप्रकरणी चित्रपट अभिनेत्री कंगनाचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही.
जावेद अख्तर (Javed Akhtar) बदनामी प्रकरणी मुंबई न्यायालयाने कंगनाला फटकारले आहे. न्यायदंडाधिकारी आर आर खान यांनी कंगना रणौतसाठी (Kangana Ranaut) सांगितले की, सेलिब्रिटी असल्याने तिच्याकडे व्यावसायिक काम असू शकते. परंतू तिने हे विसरू नये की, ती एका खटल्यातील आरोपी आहे.
कंगनाची याचिका फेटाळून लावताना न्यायदंडाधिकारी आर आर खान म्हणाले की, “समन्स बजावल्यापासून आरोपी कंगना रणौत दोन वेळा हजर झाली आहे, ही रेकॉर्डची बाब आहे. या प्रकरणाची सुनावणी तिची निवड आहे.” कायद्याच्या प्रस्थापित प्रक्रियेसह आणि तिच्या जामीन बाँडच्या अटी व शर्तींसह आरोपीला त्याचे पालन करावे लागेल.
न्यायदंडाधिकारी आर आर खान म्हणाले की, निःसंशयपणे, सेलिब्रिटी असल्याने आरोपीची व्यावसायिक कर्तव्ये आहेत. परंतु ती या प्रकरणात आरोपी आहे हे विसरू शकत नाही. मेट्रोपॉलिटन कोर्टाचे न्यायाधीश आर आर खान यांनी कोर्टाच्या कामकाजात भाग घेण्यापासून कायमची सूट मिळावी यासाठी कंगनाचा अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ एप्रिलला होणार आहे. कोर्टाने कंगनाची याचिका फेटाळताना सांगितले की, तिला विशेष परिस्थितीत कोर्टात हजर राहण्याची सूट दिली जाईल. यात तक्रारदार आणि आरोपी दोघांची संमती दिसेल. २०२० मध्ये जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरुद्ध एका दूरचित्रवाणी मुलाखतीदरम्यान तिच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा