Sunday, October 1, 2023

सेल्फ ‘डे’ आऊट! पहिल्यांदाच भारताबाहेर गेलेल्या ”या” अभिनेत्रीने खास पद्धतीने साजरा केला वाढदिवस

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो आजच्या घडीला टेलिव्हिजन विश्वातील सर्वत लोकप्रिय आणि गाजणारा शो आहे. या शोने अनेक मोठ्या आणि प्रतिभावान कलाकारांना नव्याने ओळख मिळवून दिली. सोबतच अनेक नवीन कलाकारांना या क्षेत्रात स्थिर केले. याच शोचा एक भाग असलेली आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली एक अभिनेत्री म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. आपल्या उत्तम विनोद बुद्धीने तिने मराठी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. सध्या रसिका शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. नुकताच रसिकाने तिचा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रसिकाने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानले असून. काही खास गोष्टी फॅन्ससोबत शेअर केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika (@rasikavengurlekarofficial)

रसिकाने तिचे लंडनमधील काही फोटो पोस्ट करत लिहिले, “रसिका सध्या शूटिंगनिमित्त लंडनला आहे. नुकताच तिचा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. रसिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत. “माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या माध्यमातून तुमच्या शुभेच्छा तुमचं प्रेम माझ्या पर्यंत पोहोचलं..सगळ्यांचे खूप खूप आभार..खूप प्रेम !! सगळ्यांना पर्सनली रिप्लाय करणं अशक्य आहे. पण तुमच्या शुभेच्छांमुळे मला भरुन आलं आहे. या वर्षीचा वाढदिवस विशेष होता. कारण पहिल्यांदाच मी भारताबाहेर आलेय, लंडनला…“ वडापाव “ या सिनेमाच्या शूटिंग साठी..त्यामुळे भारत आणि यूके असा एकंदर दोन दिवस माझा वाढदिवस साजरा झाला. १० जुलै भारतातल्या रात्री १२ वाजता मी लंडनमध्ये सिनेमाचं शूटिंग करत होते आणि दुसऱ्या दिवशी ११ जुलैला ऑफ होता, म्हणून एकटीने लंडन फिरायचं ठरवलं. लंडन पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्यूब, बस आणि जास्तीत जास्त चालत लंडन आय, बिग बेन, द रिव्हर थॅमेस, व्हिक्टोरीया गार्डन असं छान फिरले…लंडनमध्ये एकट्याने फिरायची मजा काही औरच आणि मग चालत पोहचले डच थिएटरजवळ…नशीबाने मला “द प्ले दॅट गोज राँग“ या नाटकाचं ऑन द स्पॉट टिकीट मिळालं आणि कमाल मज्जा आली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सिनेमाचं शूटिंग, एकटयाने भटकणं, नवीन गोष्टी एक्सप्लोर करणं, नाटक पाहणं , स्वतःला पँपर करणं असं सगळच करता आलं. लंडनमधील माझा हा वाढदिवस बेस्ट होता. थोडी घरची आठवण आली, पण प्रसाद ओक सर, मंजिरी ताई आणि वडापाव फॅमिलीला धन्यवाद.”

रसिकाच्या या पोस्टवर तिच्या फॅन्ससोबतच अनेक कलाकारांनी कमेंट्स करत तिच्या या डे आऊटबद्दल तिचे कौतुक केले आहे. दरम्यान रसिका सध्या तिच्या आगामी ‘वडापाव’ या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहे. सोबतच ती महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसवताना देखील दिसत असते.

अधिक वाचा- 
काय सांगता! अभिनेता अभिषेक बच्चन करणार राजकारणात प्रवेश? वाचा संपूर्ण प्रकरण
मोठी बातमी टीव्ही अभिनेत्याने एका व्यक्तीवर झाडली गोळी, अभिनेता पोलिसांच्या ताब्यात

हे देखील वाचा