महेश बाबूच्या ‘सरकारू वारी पाटा’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला ‘हा’ रेकॉर्ड, थालापति विजयचा ‘मास्टर’ देखील ठरला रेकॉर्ड मेकर


चित्रपट प्रदर्शित झाले की, कमाईचे नवनवीन रेकॉर्ड बनवत असतो. कोणत्या अभिनेत्याचा सिनेमा किती कमाई करेल हे तर कलाकाराच्या लोकप्रियतेवरून सुद्धा समजते. मात्र याला देखील अनेक अपवाद आहेत. मात्र सिनेमांचे रेकॉर्ड फक्त कमाईच्याच बाबतीत असतात का? तर नाही. कमाई व्यतिरिक्त देखील प्रत्येक सिनेमा काहींना काही रेकॉर्ड बनवत असतो. काही रेकॉर्ड अभिमानस्पद तर काही लज्जास्पद असतात. सध्या एक दाक्षिणात्य सिनेमा असाच एका रेकॉर्डमुळे चर्चेत आला आहे.

साऊथ स्टार महेश बाबू आणि अभिनेत्री कीर्ती सुरेश यांच्या ‘सरकारू वारी पाटा’ आणि पवन कल्याण, निवेथा थॉमस, अंजली, अनन्या नगल्ला यांच्या ‘वकील साब’ या दोन चित्रपटांमध्ये एक सारखीच गोष्ट दिसून येत आहे. या दोन्ही चित्रपटांच्या हॅशटॅगने २०२१ मध्ये सोशल मीडियावर एक रेकॉर्ड बनवले आहे.

#SarkaruVaariPaata एंटरटेनमेंट श्रेणीमध्ये सर्वात जास्त Quoted tweet तयार झाले आहे. तर #VakeelSaab टॉलीवुडचा सर्वात जास्त वापरलेला हॅशटॅग बनला आहे. जेव्हा महेश बाबूने त्याच्या चित्रपटाचा पहिला लूक शेअर करताना ट्विटरवर लिहिले होते की, “ऍक्शन आणि मनोरंजनाच्या या प्रवासाची नवी सुरुवात. या संक्रांतीपासून आमच्यासोबत जोडले जा. महेश बाबूचे हे ट्विट ५१००० पेक्षा अधिक वेळा रिट्विट केले गेले तर ७००० Quoted ट्विट मिळाले असून देशात मनोरंजनाच्या संबंधातील ट्विट साठी सर्वात जास्त आहे. यावरूनच आपल्याला लक्षात येईल की प्रेक्षक या चित्रपटांसाठी किती जास्त उत्साहित आहे. हा सिनेमा मकरसंक्रांतीला प्रदर्शित होणार नाही, तर १ एप्रिल २०२२ ला प्रदर्शित होत आहे.

तर ‘वकील साब’ हा सिनेमा २०२२ एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचे नाव फक्त २०२१ या वर्षात नाही तर २०२० वर्षांपासून दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये गाजत आहे. सोबतच या सिनेमाचा २०२० मध्ये देखील हॅशटॅग सर्वात जास्त वापरला गेला. वेणू श्रीराम दिग्दर्शित या सिनेमाच्या निर्मात्यांनी हा रेकॉर्ड सांगण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आणि नंतर ‘#VakeelSaab 2021 मध्ये सर्वात जास्त ट्विट केलेला तेलगी सिनेमा असून, २०२१ मध्ये देखील हा हॅशटॅग तसाच आहे.

या दोन्ही चित्रपटांसोबतच तामिळ सिनेमा असलेल्या आणि थालापति विजय, विजय सेतुपति, मालविका मोहनन अभिनित ‘मास्टर’ सिनेमा देखील सर्वात जास्त ट्विट केला जाणारा सिनेमा ठरला. या सिनेमाने, सिनेमातील संवाद आणि गाण्यांनी उत्तर भारतातील लोकांना खूपच इंप्रेस केले. या सिनेमानंतर थालापति विजयची लोकप्रियता देखील तुफान वाढली.

हेही वाचा : 


Latest Post

error: Content is protected !!