सध्या मराठी सिने जगतात छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा सांगणारे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील शिवप्रेमींचा या चित्रपटांना अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्झंद’आणि आता सिनेमागृहात धुमाकूळ घालत असलेला ‘शेर शिवराज’ अशा ऐतिहासिक चित्रपटांची मालिकाच तयार केली आहे, त्यामुळेच शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास पाहायला मिळत असताना आता प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनीही स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावरील ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून आजपर्यंत स्वराज्याच्या इतिहासात ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ असा गौरवोद्गार ज्या मावळ्यांबद्दल काढला जातो त्यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंवरुन या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत याबद्दलची घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी “इतिहासात अजरामर झालेली छत्रपती शिवरायांच्या एकनिष्ठ शूरवीरांची बलिदान गाथा, मोठ्या पडद्यावर साकारणार न भूतो न भविष्यती असा डोळे दिपवणारा रणसंग्राम,मराठीतली आजवरची सर्वाधिक बजेटची महाकलाकृती वीर दौडले सात दिवाळी २०२३” असा कॅप्शन देत चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. २०२३ मध्ये दिवाळीच्या वेळीच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बातमीने जगभरातील शिवप्रमींना आनंद झाला असून पुन्हा एकदा सिनेमागृहे शिवरायांच्या घोषनेने गरजणार आहेत.
सबसे बडा ऐलान!
इतिहास के पन्नों में अमर हुई छत्रपती शिवाजी महाराज के
जांबाज वीरों की बलिदान गाथाऐसी कहानी जो ना कभी देखी होगी, ना कभी देखेंगे
बडे पर्दे पर गरज उठेगा महान वीरों का रणसंग्रामवो सात
दिवाली २०२३#veerdaudlesaat #wohsaat #woh7 #veerdaudle7 #pratapraogujar pic.twitter.com/YcFfhm1mUa— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) May 1, 2022
वेडात दौडले वीर मराठे सात हे गौरवोद्गार १६७४ मध्ये स्वराज्याच्या सात शिलेदारांनी दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल काढले होते. यामध्ये विसाजी बल्लाळ, दीपोजी राउतराव, विट्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धि हिलाल, विठोजी शिंदे, सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव गुजर या मावळ्यांचा सहभाग होता. ही थराराक, शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची आता जगभरातील शिवप्रेमींना उत्सुकता लागली आहे. महेश मांजरेकर यांनी याआधी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये त्यांनी मांडलेली कथा आणि शिवरायांच्या भूमिकेने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर
अनुष्काबरोबरच्या पहिल्याच भेटीत विराटने जोक मारला अन् तो फसला, पुढे अनुष्काने…