Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड गरोदरपणाच्या अफवांवर माहिरा खानने तोडले मौन, अभिनयातून ब्रेक घेतल्याचे कारणही केले स्पष्ट

गरोदरपणाच्या अफवांवर माहिरा खानने तोडले मौन, अभिनयातून ब्रेक घेतल्याचे कारणही केले स्पष्ट

दुसऱ्या लग्नानंतर तीन महिन्यांतच पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान (Mahira khan) गुड न्यूज देणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली. त्यानंतर बी टाऊनसह सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. अशातच तिनं दोन प्रोजेक्ट नाकारल्यातची माहिती समोर आल्याने तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेला जोर मिळाला. महिराबद्दल अनेक उलट सुलट चर्चा रंगु लागल्या. दरम्यान महिराने या चर्चेवर मौन सोडलं असून पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

एका मुलाखती दरम्यान, महिराने तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवेवर भाष्य केलं आहे. मी प्रेग्नंट आहे यामध्ये काहीही तथ्य नाही. मी नेटफ्लिक्स सीरिजदेखील सोडलेली नाही. लग्नानंतरही माहिरा करिअरवरच लक्ष केंद्रित करणार आहे. तिच्या करिअरसाठी हा नेटफ्लिक्स प्रोजेक्ट खूप महत्वाचा आहे. ती काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे महिराने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी महिराच्या प्रेग्नेन्सीसंदर्भात एक पोस्ट व्हायरल झाली होती. ‘तिने अभिनयातून ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला आहे. कारण ती सप्टेंबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. तसंच तिने फवाद खानसोबतचा नेटफ्लिक्स प्रोजेक्टही सोडला आहे.’ यानंतर माहिरावर संमिश्र प्रतिक्रिया उमटु लागल्या. दरम्यान, या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसून ही अफवा असल्याचे सांगत महिराने होणाऱ्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ या चित्रपटातून महिराने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने शाहरुखसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती. माहिरा अभिनयासह तिच्या वैयक्तिक जीवनामुळे अनेकदा चर्चेत येते. २०२३ मध्ये माहिराने सलीम करीमशी दुसरं लग्न केलं. मध्यंतरी तिनं वैयक्तिक जीवनाबद्दल अनेक खुलासे केले होते. यावेळी तिने ‘बरोबर १० वर्षांपूर्वी माझं आयुष्य बदललं.

मी २५ वा वाढदिवस साजरा करणार होते आणि एका बाळाची आई झाले होते. हे १० वर्ष म्हणजे १ हजार वर्षासारखे वाटत आहेत. आयुष्यभराचा अनुभव मिळाला असं वाटत आहे. मी आई झाले, अभिनेत्री झाले. मला यश आणि प्रसिद्धी मिळाली. मी प्रेमात पडले. अनेकदा मी निराश व्हायचे पण जिद्द कधीच सोडली नाही. मला माझ्या स्वप्नांची जाणीव झाली आणि काही गोष्टींचा त्याग करावा लागला. पण त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी आभारी आहे.’ अशी भावना महिरा व्यक्त केली होती.

हे देखील वाचा