Friday, April 25, 2025
Home मराठी ‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख

‘माझा होशील ना’ या मालिकेने टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती. यातील गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. यातील कलाकारांनी देखील अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

अभिनेता विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ तो बऱ्याचदा चाहत्यांसोबत शेअर करतो. बऱ्याचदा तो सेटवरीलही फोटो शेअर करतो. पुन्हा एकदा विराजसने सेटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्याच्या मजेदार कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. हे फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, जे चाहत्यांमध्ये बरेच पसंत केले जात आहेत.

या फोटोत तुम्ही पाहू शकता की, विराजस खुर्चीवर बसलेला आहे आणि त्याचं शर्ट पूर्ण रक्ताने माखलेलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो नवरदेवाच्या वेशात खुर्चीवर बसलेला दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, या दोन्ही फोटोमध्ये तो डोक्याला हात लावून बसला आहे. त्याला पाहताच आपल्या लक्षात येईल की, तो खूप टेन्शनमध्ये आहे. (majha hoshil na fame aditya is tensed due to sai see photos)

हे फोटो शेअर करत विराजस कॅप्शनमध्ये म्हणतोय की, “MBA चा टॉपर होता. सई आयुष्यात आली आणि…” हे मजेदार कॅप्शन पाहून नेटकऱ्यांमध्ये चांगलाच हशा पिकला आहे. नेटकरी देखील वेगवेगळ्या मजेदार कमेंट या फोटोवर करत आहेत. तसेच लाईक्सच्या माध्यमातून ते त्यांचं प्रेमही दर्शवत आहेत. फोटोवर लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय. या फोटोवर आतापर्यंत २० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘कुरूप तुम्ही नाही तर समाज आहे…’; जॅकलिन फर्नांडिसने केवळ टॉवेलने शरीर झाकत दिली फोटोसाठी पोझ

-वाढत्या वयात आईने भेट दिले होते ‘सेक्स एज्युकेशन’चे पुस्तक; इरा खानने सोशल मीडियावर केला खुलासा

-एकेकाळी कापड गिरणीमध्ये करायचा काम, तर आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; वाचा साऊथ इंडस्ट्रीच्या ‘सिंघम’बद्दल

हे देखील वाचा