‘कुरूप तुम्ही नाही तर समाज आहे…’; जॅकलिन फर्नांडिसने केवळ टॉवेलने शरीर झाकत दिली फोटोसाठी पोझ


बॉलिवूडमधील हॉट आणि नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस होय. जॅकलिन ही इंडस्ट्रीमधील एक व्यस्त अभिनेत्री आहे. कधी चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या म्युझिक व्हिडिओमुळे ती प्रेक्षकांच्या चर्चेत असते. नुकतेच जॅकलिनचे बादशाहसोबत ‘पानी पानी’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. जॅकलिन ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा अत्यंत बोल्ड फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सोबत तिने जे कॅप्शन दिले आहे. यामुळे लोक विचार करत आहेत की, तिने हे असे कॅप्शन नक्की का दिले आहे?

जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने केवळ टॉवेल घेतलेला दिसत आहे. या लाल रंगाच्या टॉवेलमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करून समाजाला जोरदार टोला मारला आहे.

हा फोटो शेअर करून जॅकलिनने कॅप्शन दिले आहे की, “कुरूप तुम्ही नाही तर हा समाज आहे.” #liveyourlifenow तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने केवळ टॉवेलने तिचे शरीर झाकले आहे. तिचे हे फोटो बाथरूममधील आहे. ती आरश्याच्या समोर उभी राहून पोझ देताना दिसत आहे. ( Jacqueline Fernandez give pose only in towel, share photos on social media)

तिचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिचे अनेक चाहते तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. ही काही पहिली वेळ नाही, जेव्हा जॅकलिनने तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या आधी देखील तिने अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘जुडवा २’, ‘किक’, ‘रेस ३’, ‘हाऊसफुल ३’, ‘डिशुम’, ‘अ फ्लाईंग जॅट’ या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. या सोबत ती लवकरच ‘किक २’, ‘भूत पोलीस’, ‘सर्कस’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

-राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

-आर्ची अन् परश्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र?? फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा


Leave A Reply

Your email address will not be published.