Thursday, July 31, 2025
Home वेबसिरीज मिर्झापूरचा किंग कोण ? गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्यचा पेच सुटणार ‘या’ दिवशी

मिर्झापूरचा किंग कोण ? गुड्डू भैय्या आणि कालीन भैय्यचा पेच सुटणार ‘या’ दिवशी

ओटीटी वरील प्रदर्शित ‘मिर्झापूर‘  या लोकप्रिय वेबसिरिजने अनेक चाहत्यांना भुरळ घातली आहे. त्याशिवया यामधील प्रत्येकच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. यामधील अनेक कलाकारांचे नशीब या वेबसिरिमुळे पालटलं आहे. गुन्हेगारी जागातील अस्सल मेजवानी या वेबसीरिजमध्ये पाहायाला मिळाली आहे. आतापर्यात मिर्झापूरचे दोन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता प्रेक्षकांना या वेबसिरिजच्या तीसऱ्या सीझनची आतुरता लागली आहे.

कालीन भैय्या  हा त्याच्या मुलाच्या खुनाचा बदला घेणार की, गुड्डू भैय्या मिर्झापूरचा (Mirzhapur) राजा बनणार? अशा महत्वाच्या टप्पयावर ही बेवसिरिज येऊन ठेपली आहे. त्यामुळे काही चाहते अंदाज लावत आहेत की, समजा पंडितला जर तुरुंगात जावे लागले तर मिर्झापुरची सर्व सूत्रं गोलूच्या हातात येऊ शकतात, तर काहींच्या मते नेमकं मिर्झापूरवर कोणाचं वर्चस्व असेल हेच पाहाण्यासाठी चाहत्यांमध्ये आतुरता पाहायला मिळत आहे. (Making audience predictions about the Mirzapur Bayseries)

माध्यामातील वृत्तानुसार मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनचे पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु झाले असून वेबसिरिजचे चित्रिकरण पुर्ण झालं आहे. त्यामुळे वेबसिरिजचे निर्माता आणि प्राइम व्हिडिओ लवकरच मिर्झापुरच्या तिसऱ्या सीझनच्या प्रदर्शानची तारिख जाहीर करण्याची शक्याता दर्शवली जात आहे. या सीझनमध्ये देखिल क्रामइम ड्रामा आणि अ‍ॅक्शन त्याच पद्धतीने असून काही जुनी पात्र देखिल पुन्हा पाहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

काही दिवसांपूर्वी या वेबसिरिजमधील कलाकारांची भाषा, दाखवले जाणारे दृष्य यामुळे वेबसिरिजच्या तिसऱ्या सीझनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, तिसऱ्या सीझनला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आता लवकरच ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) , अली फजल (Aali Fazhal), श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi), रसिका दुग्गल (Rasika Duggal) सारखे दमदार कलाकार पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. (Mirzapur web series will soon meet the audience)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बिग बॉस फेम शहनाज गिल भडकली मीडियावर पत्रकारावर ओरडत म्हणाली…
‘प्रसाद ओक सर अचानक प्रयोगाला आले आणि…’ संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

हे देखील वाचा