झक्कास! वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा खास फोटो, म्हणाली…


‘इश्कजादे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा डॅशिंग अभिनेता म्हणजे अर्जुन कपूर. शनिवारी (26 जून) अर्जुन त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या जन्म 26 जून, 1985 साली मुंबई येथे झाला होता. आज त्याच्या वाढदिवशी त्याचे चाहते तसेच बॉलिवूडमधील अनेक मंडळी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तरी अर्जुन कपूरसाठी एक खास व्यक्तीच्या शुभेच्छा खूप महत्वाच्या आहेत. अर्जुनच्या आयुष्यातील ती खास व्यक्ती म्हणजे त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरा. (Malaika Arora share a photo with Arjun Kapoor on social media to give birthday wishesh)

मलायका अरोराने सोशल मीडियावर अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मलायका अर्जुन कपूरसोबत खूप खुश दिसत आहे. ते दोघेही कोणत्यातरी निसर्गरम्य परिसरात आहेत. या फोटोत मलायकाने अर्जुनला मिठी मारलेली दिसत आहे. ते दोघेही खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “हॅप्पी बर्थडे माय सनशाईन.” या सोबतच तिने हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे. तिने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघे त्यांच्या रिलेशनशीपमुळे खूप चर्चेत असतात. याचे कारण म्हणजे त्यांच्या वयातील अंतर मलायका ही अर्जुनपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे त्यांना अनेक वेळा ट्रोल केले जाते. मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्न केले होते. पण काही कारणांनी त्यांचे लग्न टिकले नाही आणि त्यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा एक मुलगा देखील आहे.

अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (25 जून) रात्री मुंबईमधील एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. या पार्टीत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये त्याच्या बहिणी, अंशुला, खुशी, जान्हवी होत्या, तसेच रणबीर कपूर, आलिया भट्ट, रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने केला लॉस एंजेलिसमधील आलिशान घरासोबतचा झक्कास फोटो शेअर; किंमत वाचून येईल चक्कर

-अदा शर्माचे विचित्र अंदाजातील फोटो व्हायरल; विचारला असा प्रश्न की, नेटकरीही झाले हैराण

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ


Leave A Reply

Your email address will not be published.