Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड ‘मी या रिलेशनशिपमुळे खूप खुश आहे पण…’, अर्जुनसोबतच्या लग्नाबाबत केला होता मलायकाने खुलासा

‘मी या रिलेशनशिपमुळे खूप खुश आहे पण…’, अर्जुनसोबतच्या लग्नाबाबत केला होता मलायकाने खुलासा

आपल्या फिटनेसने सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. तिचे आणि अर्जुन कपूरचे नाते आज सगळ्यांसमोर आहे. त्यांनी त्यांचे नाते जगापासून कधीच लपवले नाही. ते दोघेही गेल्या 3 वर्षापासून एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आहेत आणि अत्यंत आनंदाने त्यांचे आयुष्य जगत आहेत. त्यांचे चाहते नेहमीच त्यांना हा प्रश्न विचारत असतात की, ते दोघे लग्न कधी करणार आहेत?, या प्रश्नावर त्या दोघांनीही अनेक मुलाखतींमध्ये उत्तर दिले होते.

एका मुलाखतीत मलायका अरोराने सांगितले होते की, ‘मी अर्जुन कपूरसोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे खूपच खुश आहे. पण आता फोकस फक्त व्यवसायावर आहे.’ मलायका ही व्यावसायिक आणि एक ब्रँड म्हणून ओळखली जाते. त्यामुळे ती सध्या त्याच गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करत आहे. तिने सांगितले, ‘लग्नासारख्या गोष्टी आधीपासूनच ठरवल्या जात नाही. त्यामुळे मी आता फक्त कामावर लक्ष केंद्रित करणार आहे आणि वेळ आल्यावर मी लग्नाचा विचार करणार आहे.’

अर्जुननेही एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जर मी मलायकासोबत असलेले त्याचे नाते लपवून ठेवले नाही, तर आता लग्नाबाबत का लपवून ठेवेल. जेव्हा वेळ येईल, तेव्हा नक्कीच या गोष्टीचा खुलासा करणार आहे. पण आता लग्नाबाबत कोणताच प्लॅन नाहीये.’

मलायकाने 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्न केले होते. पण 2017 मध्ये त्या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आली. तिने ‘छैया छैया’, ‘मुन्नी बदनाम हुई’ यांसारखे आयटम साँग केले आहेत. मलायका उत्कृष्ट डान्सरसोबत एक मॉडेल देखील आहे. तिने अनेक रिऍलिटी शो जज देखील केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढलेला रेमो, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, वाचा त्याची संघर्षमय कहाणी

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

हे देखील वाचा