Monday, April 15, 2024

दुःखद! प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

मल्याळम अभिनेते मामुकोया यांचे बुधवारी (दि. 26 एप्रिल)ला कोझिकोड येथील रुग्णालयात निधन झाले. माध्यमातील वृत्तानुसार, मलप्पुरम जिल्ह्यातील एका फुटबॉल स्पर्धेशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होत असताना सोमवारी रात्री अभिनेता बेशुद्ध पडले, ज्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अभिनेता मामुकाेया (mamukkoya) यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. उपचारादरम्यान अभिनेत्याची प्रकृती स्थिर हाेती मात्र, त्यांना हृदयविकाराचा झटका आला, ज्यानंतर बुधवारी (दि. 26 एप्रिल)ला दुपारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अभिनेता 76 वर्षांचा होता. मामुकोया यांनी 1979मध्ये थिएटरमधून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मामुकोया यांनी विनोदी कलाकार म्हणून आपला ठसा उमटवला.

मामुकोया यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत 450हून अधिक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची मलबार बोली आणि त्यांची शारीरिक उंची. अभिनेता कायमच प्रेक्षकांना हसवायचे. 2022मध्ये अभिनेता विक्रमच्या ‘कोब्रा’ चित्रपटातही दिसले हाेते. मामुकोयाने ‘फ्लेमेन्स ऑफ पॅराडाइज’ या फ्रेंच चित्रपटातही काम केले आहे.

सिनेमा आणि चित्रपटांव्यतिरिक्त, मामुकोया यांना साहित्य आणि नाट्यक्षेत्रातही रस होता. याशिवाय धर्म, राजकारण अशा सर्वच मुद्द्यांवर ते आपले मत मांडत असे. मामुकोया यांनी त्यांच्या कामगिरीसाठी दोन राज्य पुरस्कार जिंकले आहेत.(malayalam actor mamukkoya passes away at 76 after suffering heart attack during a football tournament)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

‘पोन्नियन सेल्वन 2’च्या प्रमोशन दरम्यान आली ऐश्वर्याला सलमानसोबतच्या ‘या’ सिनेमाची आठवण म्हणाली…

हे देखील वाचा