Saturday, June 15, 2024

पहिला दिग्दर्शकीय सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच दाक्षिणात्य दिग्दर्शक जोसेफ मनु जेम्स यांचे अल्पशा आजाराने निधन

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील तरुण चित्रपट निर्माते असणारे जोसेफ मनु जेम्स यांचे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुःखद निधन झाले आहे. एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ३१ वर्षीय जोसेफ यांची अचानक तब्येत खराब झाली आणि त्यांना राजगिरीच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेथील एका व्यक्तीने सांगितले की जोसेफ यांना निमोनिया झाला होता. लवकरच जोसेफ यांचा पहिला वहिला सिनेमा ‘नॅन्सी राणी’ प्रदर्शित होणार आहे. जोसेफ यांच्या निधनामुळे मल्याळम इंडस्ट्रीमध्ये दुःखाची लाट पसरली आहे.

अहाना कृष्णा आणि अर्जुन अशोकन या कलाकारांनी मनू यांच्या ‘नॅन्सी राणी’ या सिनेमात अभिनय केला असून, हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोसेफ यांच्या निधनामुळे दुखी झालेल्या अहानाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर लिहिले, “रेस्ट इन पीस मनु! हे तुझ्यासोबत नव्हते व्हाल पाहिजे.”

जोसेफ मनु यांचा पहिला सिनेमा नॅन्सी राणी सध्या पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे. चित्रपटात अहाना कृष्णकुमार, अर्जुन अशोकन, अजु वर्गीज, श्रीनिवासन, इंद्रांस, सनी वेन, लेने, लाल आदी अनेक कलाकार या सिनेमात भूमिका साकारताना दिसणार आहे. अजु वर्गीज यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर जोसेफ यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “खूपच लवकर निघून गेलास भावा.”

जोसेफ मनू यांनी एक अभिनेता म्हणून त्यांच्या करियरची सुरुवात २००४ साली केली होती. त्या वेळी साबू जेम्स यांच्या आलेल्या ‘आई एम क्यूरियस’ या सिनेमात त्यांनी एका मुलाची भूमिका केली होती. मल्याळम आणि कन्नड सिनेसृष्टीमधे त्यांनी त्यांच्या मेहनतीने स्वतःची जागा बनवली होती. पुढे त्यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले होते. जोसेफ यांच्या पत्नीचे नाव मनू नैना असे आहे. जोसेफ यांच्यावर २६ फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले गेले.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

‘तारक मेहता’ वयाच्या 42 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात, इंटिरियर डिझायनर चांदनीसोबत थाटला संसार

 

हे देखील वाचा