पहिल्याच सिनेमात दिले तब्बल १७ किसिंग सिन; ‘अशी’ झाली होती ‘किसिंग राणी’ची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

पूर्वी बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये बोल्ड सिन तर सोडाच पण एखादं दुसरा किसिंग सिन मुश्किलीने असायचा. परंतु, मल्लिका आली आणि सारं काही बदलुनच गेलं.


बॉलिवूडमध्ये आजकाल बोल्ड सिन असणं अगदी सामान्य झालं आहे. त्यातल्या त्यात एखादा किसिंग सिन हा हमखास असतोच. बॉलिवूडचा सिरीयल किसर म्हणून इम्रान हाश्मीला ओळखलं जातं आणि किसिंग क्वीन म्हणून मल्लिका शेरावतला ओळखलं जातं.

पूर्वी बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये बोल्ड सिन तर सोडाच पण एखादं दुसरा किसिंग सिनच मुश्किलीने असायचा. परंतु अभिनेत्री मल्लिका शेरावतची एन्ट्री बॉलिवूडमध्ये झाली आणि त्यानंतर हे सारं काही बदलुनच गेलं.

mallika sherawat
mallika sherawat

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचं आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा काही कमी नाही आहे. मल्लिका एका जाट कुटुंबातील असून तिचा जन्म २४ ऑक्टोबर १९७६ रोजी हरियाणाच्या रोहतक इथं झाला.

मल्लिकाच्या कुटुंबातुन, विशेषत: तिच्या वडिलांचा मल्लिकाच्या अभिनेत्री होण्यास तीव्र विरोध होता. परंतु, यासाठी मल्लिकाला तिच्या आईचा पूर्ण पाठिंबा मिळाला ज्यामुळे ती अभिनेत्री बनू शकली. खरं तर मल्लिकाचं मूळ नाव रीमा लांबा होतं पण तिने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी तिचं नाव बदलून मल्लिका केलं.

मल्लिकाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण ‘जीना सिर्फ मेरे लिये’ या चित्रपटाद्वारे झालं. ज्यामध्ये तिची भूमिका अगदी लहानशी होती. या चित्रपटात करीना आणि तुषार कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. परंतु मल्लिकाला खरी ओळख मिळाली ती ख्वाइश या सिनेमामुळे… २००३ साली आलेल्या या चित्रपटात मल्लिकाने एकामागून एक १७ किसिंग सिन देऊन सर्वांनाच चकित केलं.

ख्वाइशच्या प्रदर्शनानंतर मल्लिका रातोरात स्टार बनली. मल्लिकाची लोकप्रियता पाहून महेश भट्ट कॅम्पने तिला ‘मर्डर’ या चित्रपटाची ऑफर दिली. ज्यात इमरान हाश्मीसोबत मल्लिकाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटात देखील असलेला मल्लिकाचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना खूप आवडला.

सोबतच हा चित्रपट एक म्युझिकल हिट देखील असल्याचे सिद्ध झाले. मात्र, यानंतर मल्लिकाने बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये आपलं नशीब आजमावलं पण हवं तस यश काही तिला मिळू शकलं नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.