Monday, June 17, 2024

….म्हणून मी प्रियांका चोप्राचं नावं घेतलं नाही; बिग बॉस फेम मनाराचा मोठा खुलासा

बिग बॉसचा 17 वा सिझन गाजवणारी स्पर्धक मनारा चोप्रा (Mannara chopra) सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच मनारा अन् बिग बॉसच्या घरातील हँडसम हंक अभिषेक कुमार या दोघांच ‘सांवरे’ हे साँग लॉन्च झालं. दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ पाडली आहे. अशातच एका मुलाखती दरम्यान मनाराने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिनं वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं.

एका मुलाखतीदरम्यान, देसी गर्ल प्रियांका चोप्रावरुन मनाराला प्रश्न विचारण्यात आला. बिग बॉसच्या घरात असताना तू तुझी बहिण प्रियांका चोप्राचे नावं घेण्यास का टाळलंस? असा सवाल उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, मी शो ऑफवर विश्वास ठेवत नाही.

मनारा म्हणाली, माझं आयुष्य केवळ एक फंडा आहे. मला इतर कोणाच्या नावाचे उपकार घ्यायचे नाहीत. तुम्ही मला ओळखता, माझ्याबद्दल बोला. माझ्या घरच्यांबद्दल बोलायचं कशाला? माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे मला बिग बॉसमध्ये बोलावण्यात आले होतं. मनारा काय आहे? तुम्ही मला माझे चित्रपट, माझा प्रवासया गोष्टींबद्दल विचारा. माझ्यासोबत भांडा, गप्पा मारा पण यामध्ये माझ्या कुटूंबाला आणण्याची गर नाही. त्यांचे स्वतःचे वैयक्तिक आयुष्य आहे.

असे सांगत मनारा पुढे म्हणाली, माझ्या मते तुम्ही जगासमोर स्वतःची ओळख कशी आणि काय निर्माण करता हे महत्त्वाचे आहे. मला वाटते की, शोमध्ये आलेले सर्व सेलिब्रिटी आणि शोचा होस्ट सलमान खान यासर्वांना मनाराला पाहण्याची इच्छा होती. शोमध्ये मी वारंवार इतर लोकांची नावं घेतली तर ते चांगलं दिसणार नाही.

खुप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मनारा अन् अभिषेकचे ‘सांवरे’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यामध्ये दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ‘सांवरे’ हे गाणं अंशुल गर्गने लिहले असून गाण्याचे कंम्पोज अखिल सचदेव आणि कार्तिक देव यांनी केलं आहे. या गाण्यामध्ये मनारा आणि अभिषेक यांची छोटीशी लव्हस्टोरी पाहायला मिळत आहे.

मनारा अभिनेत्री आणि मॉडेल असण्यासोबत फॅशन डिझायनर आहे. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनाराने मुंबई गाठली. मॉडेलिंग करत तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 40 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये तिने काम केलं आहे. मनाराने 2014 मध्ये अनुभव सिन्हा यांच्या ‘जिद’ या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. आजवर तिने अनेक तेलुगू, तामिळ, हिंदी आणि कन्नड सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अल्लू अर्जुनचा चाहत्यांना सुखद धक्का; पुष्पा 2 रिलीजपूर्वीच केली मोठी घोषणा
घटस्फोटानंतर ईशा देओलची राजकारणात एन्ट्री? आई हेमा मालिणी यांच्या वक्तव्याने खळबळ

हे देखील वाचा