Saturday, July 6, 2024

‘तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला’ गाण्यावर मानसीने शेअर केला पतीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ, म्हणाली ‘तुझ्यासारखा…’

‘बघतोय रिक्षावाला’ गाण्याचे नाव उच्चारताच सर्वप्रथम नाव समोर येते, ते म्हणजेे मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकचे. मानसी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. सध्या ती आपले वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना दिसत आहे. लग्न झाल्यापासून ती आपला पती प्रदीप खरेरासोबत बरेच फोटो सोशल मीडियावर टाकताना दिसत आहे. नुकताच तिने गुढीपाडव्यानिमित्त शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये ती पतीसोबतही दिसत आहे.

मानसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती आपल्या पतीसोबत ‘तुझ्या प्रितीचा विंचू मला चावला’ या गाण्यावर रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, “आसमंतात दिसती हजारो तारे, पण चंद्रासारखा कुणी नाही, लाखो चेहरे दिसती धर्तीवर, पण तुझ्यासारखा कुणी नाही.”

यापूर्वी तिने आपल्या पतीसोबत सुंदर फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिने फुलाची नक्षी असलेल्या गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. नव्या नवरीचा जसा पेहराव असतो अगदी तसेच मानसी दिसत आहे. हे फोटो घरातले असून, तिच्यासोबत एका वेगळ्याच अंदाजात पती प्रदीप दिसत आहे.

हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘शृंगार तुझा असा पाहूनी तो चंद्रही लाजेल. अपूर्ण सौंदर्य त्याचं, तो तुझ्यात शोधेल.’

तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, मानसीला वैद्यकीय क्षेत्रात जायचे होते, परंतु ती अचानक मॉडेलिंग या क्षेत्राकडे वळली. मग काय बघता बघता तिच्या सौंदर्याने, तिच्या मोहक अदांनी चाहत्यांना वेडे केले आहे. ती चाहत्यांशी सोशल मीडियावर जोडलेली राहते. तिने तिच्या लग्नाचेही फोटो शेअर केले होते.

मानसीने सन २००७ साली ‘जबरदस्त’ चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले होते. यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. अभिनयाव्यतिरिक्त तिने आपल्या डान्सनेही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: अमिताभ अन् जया बच्चनसोबत कॅटरिना कैफने केली भावुक जाहिरात शूट, बनली बिग बींची मुलगी

-अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंगच्या ‘दिल है दीवाना’ या नवीन गाण्यावरील डान्सची धमाल, मिळाले २ कोटी हिट्स

-आपल्या आवाजाने प्रेक्षकांना वेड लावणारी श्रेया घोषाल, आता तिच्या सुंदरतेनेही करतेय चाहत्यांना घायाळ!

-‘जा अब पलट के देखब ना’ नीलकमल सिंग आणि काजल राघवानीचे सॅड साँग व्हायरल, गाण्याला मिळतेय चाहत्यांची पसंती

हे देखील वाचा