मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय जेष्ठ, दिग्गज आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून सुकन्या मोने ओळखल्या जातात. मागील अनेक दशकांपासून त्या या क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या सुकन्या यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा कमालीचा गाजत आहे. केदार शिंदे दिगदर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा आणि लोकप्रियतेचा अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
अशातच सोशल मीडियावर सुकन्या यांना आलेली एक कमेंट आणि त्यावर त्यांनी दिलेले एक उत्तर खूपच गाजताना दिसत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने खास सुकन्या यांच्यासाठी एक सुंदर भेटवस्तू पाठवली. याच भेट्वस्तूचा एक व्हिडिओ सुकन्या यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत अमृताचे आभार मानले होते. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “कित्ती छान तुझ्या सुकुताईला…. तायडे ला
एकदम खूश केलंस…. किती सुंदर आहे हे सगळ… असं कौतुक करणार विरळाच…
असेच प्रेम कायम असू दे. श्री स्वामी समर्थ…माऊली”
View this post on Instagram
सुकन्या यांच्या या पोस्टवर एका व्यक्तीने कमेंट करत लिहिले, “तुम्ही ब्राह्मण असून सुद्धा मांसाहारी पदार्थ खाता, मला वाईट वाटलं ऐकून.” या कमेंटवर सुकन्या यांनी सणसणीत उत्तर देत कमेंट करणाऱ्याला चूप केले आहे. सुकन्या यांनी लिहिले, “सॉरी कोणी सांगितले मी मांसाहारी खाते? आणि कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का? आणि ते चांगल की वाईट हेसुध्दा ज्याचे त्याने ठरवायचे असते. मी शाकाहारी आहे.”
सध्या सुकन्या यांचे हे उत्तर कमालीचे व्हायरल होत असून, खूपच गाजत आहे. दरम्यान सुकन्या यांच्या तुफान गाजणाऱ्या या सिनेमात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
अधिक वाचा-
–‘डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत…’; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
–मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’