Monday, July 15, 2024

‘आई मला खूप बोलायंच आहे,’ म्हणत हा मराठी अभिनेता आईच्या मृत्यूनंतर झाला भावूक, पोस्ट होतेय व्हायरल

सध्या कलर्स वाहिनीवरील ‘सोन्याची पावलं’ मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत दुष्यंतराव इनामदाराची भूमिका करणाऱ्या आदित्य दुर्वेवर (Aditya Durve) दुखःचा डोंगर कोसळला आहे. नुकतंच आदित्यच्या आईचं निधन झाले आहे. ज्यामुळे अभिनेता आदित्यला जोरदार धक्का बसला आहे. आपल्या आईच्या मृत्यूने शोकसागरात बुडालेल्या आदित्यने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्याने आई मला खूप बोलायचे आहे म्हणत…आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. सध्या ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, आदित्य दुर्वे हा मराठी मालिका क्षेत्रातील प्रसिद्ध प्रसिद्ध चेहरा समजला जातो. सध्या त्याच्या सोन्याची पावलं या मालिकेतील भूमिका सर्वांना आवडत आहे. तत्पुर्वी या अभिनेत्याला नुकताच त्याच्या आईच्या मृत्यूने मानसिक धक्का बसला आहे त्याने आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो म्हणतो की  “मम्मी, मला खूप काही बोलावसं वाटतंय पण आता काहीच बोलता येत नाही, फक्त एवढंच म्हणेल की तू फार लवकर सोडून गेलीस मी तुला कधी सांगितलं नाही, परंतु तुझा हा अभिनेता मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करतो. भावपूर्ण श्रद्धांजली आई. मला माहित आहे तू कायम माझ्यासोबत असणार आहेस.” आदित्यची ही पोस्ट पाहून त्याचे चाहतेही भावूक झाले आहेत. या पोस्टमध्ये त्याने आईसोबतचा एक फोटोही पोस्टही केला आहे.

दरम्यान अभिनेता आदित्य दुर्वे सध्या मराठी मालिका क्षेत्रात झळकत आहे. सोन्याची पावलं मालिकेआधी  दिल दोस्ती दुनियादारी, मंडळी भारी, कॉमेडी क्लासेस या कार्यक्रमात झळकला होता. आदित्य दुर्वे सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. यावरुन तो आपले नवनवीन फोटो शेअर करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा