दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाला जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण बॉलिवूड जगतात शोककळा पसरली होती आणि चाहत्यांना धक्का बसला होता. आता सुशांतबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, अभिनेता ज्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता, त्या फ्लॅटला अजूनपर्यंत भाडेकरू मिळाला नाही.
रफिक मर्चंट नावाच्या रिअल इस्टेट ब्रोकरने नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये फ्लॅटचा संपुर्ण दृश्य दाखवला आहे. तसेच हा फ्लॅट भाड्याने उपलब्ध असल्याचेही लिहिले आहे. त्याचे भाडे दरमहा पाच लाख रुपये आहे.
Sea Facing Duplex 4BHK with a Terrace Mont Blanc
5 lakhs Rent
Carter Road, Bandra West. RAFIQUE MERCHANT 9892232060, 8928364794 pic.twitter.com/YTcjIRiSrw— Rafique Merchant (@RafiqueMerchant) December 9, 2022
माध्यमातील वृत्तानुसार, या फ्लॅटचा मालक एनआरआय आहे आणि आता तो हा फ्लॅट कोणत्याही बॉलिवूड स्टारला भाड्याने देऊ इच्छित नाही. सध्या तो एका कॉर्पोरेट व्यक्तीला घर भाड्याने देण्यास तयार आहे. मात्र, त्याचा शोध अद्याप संपलेला नाही. खुद्द रफिक मर्चंटनेच पत्रकारांशी संवाद साधत याबाबत खुलासा केला आहे. या अपार्टमेंटमध्ये सुशांत सिंह राजपूत मृतावस्थेत आढळला होता.
रफिकला नवीन भाडेकरू का सापडत नाही असे विचारले असता त्यावर तो म्हणाला, “लोक या फ्लॅटवर यायला घाबरतात.” ते पुढे म्हणाले, “पूर्वी, जेव्हा भाडेकरूंना एक सुगावा मिळायचा की, हा तोच फ्लॅट आहे जिथे अभिनेत्याचा मृत्यू झाला, तेव्हा ते इथे भेटायलाही आले नाहीत. मात्र, आता त्यांच्या मृत्यूला एवढा कालावधी लोटल्यानंतर लोक त्यांच्या भेटीला येऊ लागले आहेत. पण, अद्याप कोणताही करार झालेला नाही.” रफिक मर्चंट सांगतात की, “घरमालक आता हा फ्लॅट कोणत्याही नायक-नायिकेला देण्यास तयार नाही.
माध्यमातील वृत्तानुसार, सुशांत सिंग राजपूतने हा फ्लॅट महिन्याला साडेचार लाख रुपये भाड्याने घेतला होता. हा फ्लॅट तो त्याची रूममेट आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबत शेअर करत असे.लॉकडाऊन दरम्यान रिया सुशांतसोबत राहायची. (bollywood actor sushant singh rajput mumbai flat fails to find new tenant owner refuses to take any more actor sushant singh rajput )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा केले वादग्रस्त ट्विट; म्हणाले, ‘अभिनेत्रीच्या कुत्र्याचे पाय चाटायला…’
जेव्हा रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते 10 रुपये; पुढे जे झाले, त्याने तुम्हीही व्हाल हैराण