Sunday, April 14, 2024

रणदीप रायसोबतच्या नात्यावर शिवांगी जोशीने तोडले मौन; म्हणाली, ‘अशा बातम्या …’

ये रिश्ता क्या कहलाता है‘ फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सध्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. शिवांगीचे मोहसिन खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता अभिनेत्रीच्या आयुष्यात नवीन प्रेमाचा प्रवेश झाल्याची बातमी आहे. यावर शिवांगीनेच या बातम्यांवर मौन तोडले आहे.

शिवांगी (shivangi joshi) ‘बालिका वधू 2’ फेम अभिनेता रणदीप राय (randeep rai) याला डेट करत असल्याची बातमी अलीकडेच आली होती. आता या वृत्तांवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. शिवांगी जोशी म्हणाली, “नाही, हे अजिबात खरे नाही. अशा बातम्या कुठून येतात माहीत नाही. तर त्याचवेळी अभिनेता रणदीपनेही आपली प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला, “शिवांगी आणि मी दोघे फक्त मित्र आहोत. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत, त्यापैकी एक शिवांगी आहे.”

माध्यमातील वृत्तानुसार, शो दरम्यान दोघेही चांगले मित्र बनले होते. ज्याचे रुपांतर प्रेमात झाले. वृत्तांमध्ये असेही सांगण्यात आले की, शिवांगी आणि रणदीप जवळपास 3 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांच्या इमारतीबाहेर दिसतात. दोघेही एकत्र जिममध्ये जातात. मात्र, आजकाल सेलिब्रिटींनी त्यांच्या नात्याचे सत्य समोर ठेवणे आवडत नाही.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून शिवांगीला मिळाली खरी ओळख
शिवांगीच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर ती शेवटची ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’मध्ये दिसली होती. मात्र,’ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली. या शोमध्ये तिने नायराची भूमिका साकारली होती. याशिवाय शिवांगी ‘बालिका वधू 2’ मध्ये देखील दिसली होती. (tv actress shivangi joshi broke silence on relationship with randeep rai)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
प्रसिद्ध अभिनेता जाणार चंद्रावर, बातमी कळताच आनंदाला उधाण
बोल्ड एँड ब्युटिफूल! जॅकलीन फर्नांडिसच्या लेटेस्ट फोटोशूटचा इंटरनेटवर राडा

हे देखील वाचा