आपल्या विनोदी स्वभावाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. त्याने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी चित्रपटात काम केले आहे. आजकाल तो जास्त चित्रपटात दिसत नाही, पण आजही त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर आहे. सोशल मीडियावर देखील तो अनेकवेळा पोस्ट शेअर करत असतो. अशातच त्याची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली हाेती. काय आहे नेमकी ती पाेस्ट? चला जाणून घेऊया…
भरत जाधवने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या आई-वडिलांसोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करून त्याने खास कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले आहे की, “आई-वडिलांना पहिल्यांदाच विमान प्रवास घडवून आणल्याची काल नीरज चोप्राची पोस्ट पाहिली आणि काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आमचं मूळ गाव कोल्हापूर. गावला बऱ्याचदा येणं-जाणं असायचं. परंतु तिथे घर नसल्यामुळे नातेवाईकांकडे मुक्कामाला असायचो. सिनेमातील माझं करिअर चांगलं मार्गी लागल्यावर आई-वडिलांनी गावी एखादं छोटसं घर घेऊन दे असं सांगितलं.” ( Marathi actor bharat jadhav share one experience with his mother and father on social media)
त्याने पुढे लिहिले की, “आई-वडिलांनी आयुष्यभर खूप कष्ट केले होते, पण सुख-सोयी खूप उशिरा त्यांच्या आयुष्यात आल्या. मग आई-वडील आणि संपूर्ण जाधव कुटुंबाला सरप्राईज देण्याचा विचार केला. कोल्हापुरात एक प्रशस्त मोठा बंगला विकत घेतला, कोणालाही सांगितलं नव्हतं. सिनेमाच्या निमित्ताने आपला कायम विमान प्रवास होत असतो, पण आपल्या आई- वडिलांचा आणि घरच्यांचा कधी होणार हाही विचार नेहमी माझ्या मनात असायचा. म्हणून शेवटी एक फ्लाईट बुक केली. ज्यात मी, आई-वडील, माझे भाऊ त्यांची फॅमिली संपूर्ण जाधव परिवार विमानाने कोल्हापूरला दाखल झालो. विमानतळावरून एक मोठी बस केली होती. त्या बसने सर्वांना आमच्या नव्या घरी घेऊन गेलो आणि आईला दाखवलं हे आपलं नवीन घर. आपल्यामुळे आई-वडिलांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान नसणे हेच खरं सुख.”
भरत जाधवने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. अनेकांना त्याची ही पोस्ट खूप आवडली आहे. त्याच्या एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट केली आहे की, “खूप भावनिक पोस्ट.” तसेच बाकी अनेक चाहते या पोस्टवर कमेंट करत आहेत.
भरत जाधवने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जत्रा’, ‘खबरदार’, ‘पछाडलेला’, ‘माझा नवरा तुझी बायको’, ‘भुताचा हनिमून’, ‘नाना मामा’, ‘होऊन जाऊ दे’, ‘अगं बाई अरेच्चा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय सिद्धार्थ शुक्लाचं नाव; तर काजोलच्या बहिणीचाही आहे यादीत समावेश
‘तो डबल मिनींग मेसेज करायचा,’ अभिनेत्रीने केला होता सिद्धार्थ शुक्लावर गंभीर आरोप