Tuesday, March 19, 2024

पॅपराझींना पाहताच नेहा कक्करने ठोकली धूम; म्हणाली, ‘जेव्हा माझा अवतार..’

आपल्या दमदार आवाजाच्या जोरावर बॉलवूड सारख्या इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण करणारी प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर कायमच चाहत्यांचे लक्ष वेधत असते. तिने खूप कमी वेळात चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. चाहते देखिल तिच्या नवीन गाण्यांची वाट पाहत असतात. सध्या अभिनेत्री तिच्या घराच्या रिनोवेशनमध्ये व्यस्त आहे. नवीन घराच्या तयारीसाठी नेहा सामानाची खरेदी करण्यासाठी बाजारात निघाली होती, तेव्हा तीला पॅपराझींनी घेरलं ज्यामुळे अभिनेत्रीने संतापल व्यक्त केला आहे.

सध्या सोशल मीडियावर नेहा कक्कर (Neha Kakkar)च्या व्हिडिओने धुमाकुळ घातला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेहा घराच्या सजावटीसाठी बरंच सामान खरेदी करताना दिसून येत आहे. नेहाने त्यावेळी काळ्या रंगाचा ट्रॅकसुट परिधान केला होता, त्याशिवाय तिने मास्क आणि गॉगलने चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, पॅपराझींनी ओळखलं आणि फोटो काढण्याासाठी तिच्या आजूबाजूला घोळका घातला. पण नेहाने फोटो काढण्यासाठी नकार दिला आणि तिथून निघून गेली.

सांगयाचं म्हणजे नेहा साधारण अवतारात होती त्यामुळ तिने फोटो काढण्यासाठी नकार दिला त्याशिवाय ती पॅपराझींना म्हणाली की, “जेव्हा माझा अवतार ठीक नसतो तेव्हाच तुम्ही माझे फोटोज क्लिक करायला येता.” नेहाने मास्क काढून फोटो क्लिक करण्यासाठी नकार दिला ती म्हणाली, “माफ करा पण मी आत्ता फोटो देण्याच्या स्थितीत नाही.”

 

View this post on Instagram

 

साधारण कुटुंबातून आपल्या कौशल्याच्या जोरावर तिने आपलं नशीब घडवलं आहे. इंडस्ट्रीमध्ये तिला कोणात्याही ओळखीची गरज नाही. जागरणात गाणी म्हणारी नेहा आज मोठ मोठे कॉन्सट करत आहे. आपल्या गाण्यासोबतच नेहा वैयक्तीक आयुष्यामुळे देखिल सतत चर्चेत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातची हळद दणक्यात पडली पार, बेभान होऊन नाचली नवरीबाई
सोनाली कुलकर्णी लवकरच देणार गुड न्युज? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा